Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

PCMC : कोणत्याही परिस्थितीत तुतारीचा प्रचार करणार नाही

पिंपरी:  वेळप्रसंगी आपण आपल्या पदांचा राजीनामा देऊ. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तुतारीचा प्रचार करणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. भोसरीतून शिवसेना ठाकरे गटालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गेल्यास या पदाधिकाऱ्यांची समजूत कशी काढणार, असा प्रश्न शिवसेनेच्या नेतृत्वासमोर असणार आहे. 

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात भोसरी चा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, हा मतदारसंघ सोडण्याची ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची तयारी नाही. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्या पक्षाकडेच राहिला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे. त्याचप्रमाणे हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे गेल्यास तुतारीचा प्रचार करणार नाही, असा ठराव या पदाधिकाऱ्यांनी गुप्त बैठकीत केला आहे.

महाविकास आघाडीत जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. ज्या जागांवर एकाहून अधिक मित्रपक्षांचा दावा आहे त्याबाबत सामंजस्याने मार्ग काढला जाईल, असे आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ठिकठिकाणच्या स्थानिक नेत्यांची समजूत काढण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading