‘बिग बॉस मराठी’च्या घरातील गाजलेली जोडी कोणती? समोर आलं नाव
Bigg Boss Marathi Day 53 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच कोणती ना कोणती जोडी गाजत असते. पण घरात सर्वाधिक गाजलेली जोडी निक्की आणि अरबाजची आहे. ‘बिग बॉस’ने स्वत: याची कबुली दिली आहे. तसेच या गाजलेल्या जोडीलाच ‘बिग बॉस’ने एक टास्क दिला आहे. आता ही गाजलेली जोडी आणखी काय धमाका करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात, ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”पुढील जोडी आहे या घरात गाजलेली जोडी”. त्यानंतर घरातील सदस्य अभिजीत आणि निक्कीच असणार असा अंदाज बांधत आहेत. ‘बिग बॉस’देखील त्यांचच नाव घेत आहेत. अंकिता म्हणतेय,”गॅससाठी भांडताना ‘बिग बॉस’ने आग लावली आहे”. ‘बिग बॉस’ पुढे मला भूक लागली आहे या संघटनेच्या अध्यक्षा अंकिता”.
दुसरीकडे ‘बिग बॉस’ जान्हवीला विचारत आहेत,”जान्हवी फळ खाताय? काकाकुवापण असचं फळ खातो”. जान्हवी पुढे म्हणते,”बिग बॉस माझ्यासमोर त्या प्राण्याचं नाव घेऊ नका”. त्यानंतर अंकिता आणि सूरज या जोडीमध्ये टाक्स रंगतो. अखिल भारतीय संचालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत सावंत हा जोडीचा संचालक असतो.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
