उद्योजक गणेश दत्तात्रय मानकर यांचे निधन
पुणे: पुण्यातील उद्योजक गणेश ऊर्फ जीवन दत्तात्रय मानकर (वय ५४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,जावई, नातु असा परिवार आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) चे अध्यक्ष दिपक मानकर यांचे चुलत बंधू व प्रणव गणेश मानकर यांचे ते वडील तसेच परेश मोहन मानकर यांचे ते चुलते होत. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात व्यापारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे व्यावसाय केला. कुस्ती शिक्षण सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
