‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत सावंत करतोय किंग खानची मिमिक्री
Bigg Boss Marathi Day 52 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेक्षकांना आज मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सूरांचा बादशाह असणारा अभिजीत सावंत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मिमिक्री करताना दिसून येईल. त्यामुळे त्याची मिमिक्री पाहताना प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होणार आहे.
‘वरण-भात बनवताना अभिजीत सावंत शाहरुख खानची मिमिक्री करताना दिसून येईल. आजच्या भागात सूरज अभिजीतला म्हणतोय,”आज तू शाहरुख खान झाला आहेस. शाहरुख खान तुम्ही आज काय बनवताय?”. त्यावर शाहरुखच्या स्टाईलमध्ये अभिजीत म्हणतो,”डाल-राईस. एकदम मस्त खिचडी बन रही है. बहोतही बढिया लग रही है. यए खिचडी मेरे दिल के बहोत करिब है”.
अभिजीतच्या मिमिक्रीनंतर सूरज आणि वर्षा ताई टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहन देतात. अभिजीतच्या रुपाने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज शाहरुख खान अवतरणार आहे. अभिजीतने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासह टास्कमध्ये कंटाळलेल्या सदस्यांचंदेखील मनोरंजन केलं आहे.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
