Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राहुल गांधी विरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन

मुंबई:  अमेरिका दौऱ्यात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने, ‘काँग्रेस हटाव, देश बचाव,’ हा नारा देत राज्यभर आंदोलन करण्यात आले. 

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांना भारतातील आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, योग्य वेळी आरक्षण बंद करण्यात येईल. मात्र, त्यासाठी योग्य वेळ अद्याप आलेली नाही, असे विधान केले होते. या विधानावरून विशेषतः भारतीय जनता पक्षाने त्यांना टीकेचे लक्ष केले आहे. त्यांच्यावर आरक्षण विरोधी असल्याची टीका केली जात आहे. 

याच मुद्द्यावरून भाजपाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. अकोल्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईत आशिष शेलार आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक शहरातही आंदोलन करण्यात आले. 

राहुल गांधी यांची मानसिकता दाखवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले तर या आंदोलनाद्वारे लोकांमध्ये खोट्या बातम्या पसरवण्याची नाटके भाजप करीत असल्याचा पलटवार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading