Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

“दम असेल तर मला बाहेर काढून दाखव”; जान्हवीचं निक्कीला चॅलेंज

Bigg Boss Marathi Day 48 : ‘बिग बॉस मराठी’ची सध्या तुफान चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल याचा काही अंदाज नाही. या घरातील सदस्यांची नात्याची समीकरणं ही नेहमी बदलताना दिसतात. निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरची घट्ट मैत्री सुरुवातीचे काही दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पण नंतर त्यांच्या मैत्रीत फूट पडली. आता त्यांच्यात जोरदार वादावादी झालेली पाहायला मिळणार आहे.

कॅप्टनसीवरुन निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भडका उडाला आहे. दोघी एकमेकांना चॅलेंज देताना आजच्या भागात दिसतील. समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणतेय,”दम असेल तर मला बाहेर काढून दाखव..चॅलेंज आहे”. त्यावर निक्की म्हणते,”कॅप्टनसीमधून तिला काढलं याचा राग आलाय तिला”. जान्हवी पुढे म्हणते,”या घरात सगळ्यांना तू घाण झाली आहेस”.

अरबाज आणि वैभव करतायत जान्हवीबद्दल चर्चा

वैभवला अरबाज म्हणतोय,”आता तू माझं दुसरं रूप बघशील. जान्हवीने माझ्यावर आरडाओरडी केली. टास्कदरम्यान तिने मला खूप इरिटेड केलं आहे. मला खूप काही बोलली. जान्हवी आपल्यासाठी खेळतेय हे माझ्या मनात आलं नाही”. वैभव पुढे अरबाजला सांगतो जान्हवीने माझ्यासाठी खेळण्याला होकार दिला होता. अरबाज पुढे म्हणतो,”वैभवला उडवायचं असं ती सगळ्यांना म्हणाली होती”.

BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading