Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONAL

मोदींच्या वाढिवसानिमित्त विविध मंत्रालय आपाली कामगिरी जनतेसमोर मांडणार

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या वेळी सत्तेवर आलेल्या सरकारच्या शंभर दिवसाची पूर्तता 17 -18 सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्ताने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सरकारची विविध मंत्रालय आपापली कामगिरी जनतेसमोर मांडणार आहेत. पंतप्रधान मोदी 17 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करणार असून सरकारच्या शतकपूर्तीनिमित्त या दिवसाचा आनंद द्विगुणित होणार आहे. 

यापूर्वी सन 2014 आणि 2019 च्या सप्टेंबर महिन्यात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारांनी आपल्या शंभर दिवसांच्या पूर्ततेचा समारंभ साजरा केला. त्यावेळी निवडणूक जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या उद्दिष्टांची पूर्तता यावर भर देण्यात आला होता. या वेळी भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यास अपयश आले आहे. हे सरकार आपल्या शतकपूर्ती निमित्त महिला, शेतकरी, गरीब वर्ग आणि युवा वर्गाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची ग्वाही जनतेसमोर देणार आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त मोदी यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीची यादी , उपस्थितांसमोर मांडली. त्यामध्ये 12 नव्या औद्योगिक शहरांची निर्मिती, प्रशिक्षण कालावधी विद्यार्थ्यांना विद्यावेतन, निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा, द्रुतगती महामार्ग यांचा समावेश होता. विविध मंत्रालय यामध्ये भर घालून आपली कामगिरी लोकांसमोर मांडतील. 

राजधानीत पत्रकारांशी संवाद साधून मंत्री किरण रिजीजू शतकपूर्ती महोत्सवाची सुरुवात करतील. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वंदे भारत शयनयान रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याचा आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 11 लाख लाभार्थींना लाभ देण्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला जाऊ शकतो. संसदेचे कामकाज कागद विरहित करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या पोर्टल सहित अन्य सहा उपक्रमांचे उद्घाटन या निमित्ताने केले जाऊ शकते. 

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने देखील शतकपूर्ती निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात प्रामुख्याने गांधीनगर येथे पर्यायी ऊर्जा स्त्रोतांवर होणाऱ्या महत्त्वपूर्ण चर्चासतचा समावेश आहे. या चर्चासत्रात केंद्र सरकार, राज्य सरकार, उद्योग यांचे प्रतिनिधी आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading