Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कोणाला मिळणार जादुई दिव्याची इम्युनिटी?

Bigg Boss Marathi Day 45 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन 44 दिवस पूर्ण झाले असून आज 45 वा दिवस सुरू आहे. आजचा 45 दिवस खूपच कमाल असणार आहे. संग्रामच्या येण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वादळ आलं आहे. पण निक्की आणि अरबाजने त्याला हलक्यात घेतलेलं कालच्या भागात पाहायला मिळालं. आज घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे पाहावे लागेल.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरात नॉमिनेशन टास्क पार पडताना दिसत आहे. जादुई दिव्यात इम्युनिटी बंदिस्त आहे. नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कोणाला मिळणार जादुई दिव्याची इम्युनिटी हे पाहावे लागेल. प्रोमोमध्ये वर्षा ताई अरबाजकडे नॉमिनेट न करण्याची विनंती करताना दिसत आहेत. तर अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केलेलं पाहायला मिळत आहे. जान्हवीला मात्र अंकिताचा हा निर्णय पटलेला नाही.

अरबाजच्या कॅप्टनसीवरून सगळे घेतायत त्याची फिरकी

अरबाजच्या कॅप्टनसीप्रकरणावरुन आजच्या भागात डीपी दादा, पॅडी दादा, अंकिता आणि संग्राम त्याची फिरकी घेताना दिसणार आहेत. संग्राम म्हणतोय,”याला म्हणतात पायावर दगड नाही तर दगडावर पाय मारणं”. त्यामुळे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होणार आहे.

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading