सुवर्ण महोत्सवी वर्षात सुयोग मित्र मंडळाचा वाहतुकीची पाठशाळा देखावा
डिजिटल नॉलेज हब सेवा प्रकल्पाची घोषणा
या वर्षी गोखले नगर मधील सुयोग मित्र मंडळाने ‘वाहतुकीची पाठशाळा’ हा वाहतुक जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘ट्रॅफिक पार्क’च्या प्रतिकृतींचा देखावा सादर केला आहे. या विषयावरील ध्वनीचित्रफित दाखविण्यात येत आहे. शाडूची माती, नैसर्गिक रंग, आईस्क्रिमचे चमचे, काड्या, गवत, पुठ्ठा, भुसा, कागदी कप असे पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यात आले आहे.
परिसरातील दहा शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि पहिल्या पाच क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी हेल्मेट बक्षिस दिले जाणार आहे.
डिजिटल नॉलेज हब : कायमस्वरूपी सेवा प्रकल्प
सुयोग मित्र मंडळाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘डिजिटल नॉलेज हब’ हा कायमस्वरूपी सेवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी मंडळाने गोखलेनगरमध्ये स्वमालकीच्या 1800 चौरस फूट जागेचे बांधकाम फर्निचर पूर्ण केले आहे. या वास्तूत ‘डिजिटल नॉलेज हब’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ‘ज्ञानप्रकाश स्टडी सर्कल’ आणि ‘अंत्योदय’ असे दोन विभाग असणार आहेत.
‘ज्ञानप्रकाश स्टडी सर्कल’
एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, बँकिंग अशा परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी ‘ई-अभ्यासिका’
आसनक्षमता 60
स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ई-साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध
यूट्यूब व्हिडिओ, ई-बुकस्, रेफरन्स साहित्य, टेस्ट सीरीज, जनरल नॉलेज
स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी आवश्यक संदर्भ पुस्तके, नियतकालिके
तज्ज्ञांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
अंत्योदय योजना गृह
शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार
सर्व प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्रे
महा ई सेवा केंद्र
नागरी सुविधा केंद्र
विविध प्रकारचे शासकीय अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा
आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट काढण्याची सुविधा
पर्यावरणपूरक आणि सुरक्षित गणेशोत्सव
खड्डे विरहित मांडव
शाडू मातीची गणेश मूर्ती
विसर्जन न करता महापालिकेकडे मूर्ती सुपूर्द करणार
फ्लेक्सचा शून्य वापर, कापडी फलक
गुलालाचा वापर नाही
फटाकेमुक्त उत्सव
ध्वनी मर्यादा दर एक तासानी मीटरच्या सहाय्याने डेसिबल मोजून नियंत्रण आणि नोंद
बँड आणि ढोलपथक अशा पारंपरिक वाद्यांचा मिरवणुकीसाठी वापर
ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण
दररोज निर्माल्य संकलन, खत निर्मितीसाठी वन विभागाकडे सुपूर्द
दररोज नियमित स्वच्छता आणि नोंद
प्रथमोपचार पेटी, आगप्रतिबंधक उपाययोजना
स्वतंत्र लाईट मीटर, आवश्यक तपासणी
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह उपलब्ध
सामाजिक उपक्रम
इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानमाला
वृद्धाश्रमातील महिलांसाठी आजीबाईचा भोंडला
मोरांच्या संरक्षण व संवर्धनासाठी उपक्रम
सार्वजनिक दिवाळी
सार्वजनिक नवरात्र उत्सव
आरोग्य शिबिर
रक्तदान शिबिर
करिअर गायडन्स
संजय मयेकर
अध्यक्ष, सुयोग मित्र मंडळ ट्रस्ट
गणेश उत्सव व्यवस्थापन समिती
अध्यक्ष -मुकेश खामकर
उपाध्यक्ष – अक्षय माने
सरचिटणीस – सतीश धुमाळ
खजिनदार – आशिष माने, शुभम वाईकर
सह-खजिनदार – नितीन सोनवणे, मंगेश तडके
कार्याध्यक्ष – यशवंत नेटके, संजय आदवडे
उपकार्याध्यक्ष – नितीन सोनवणे, मंगेश तडके
कायदा सल्लागार – ॲड. महेंद्र नांगरे, ॲड. अथर्व जोशी
चिटणीस -निलेश मांडवकर, निरंजन गोरडे
हिशोब तपासणीस – अभिषेक पवार
अमित त्रिभुवन, रोहन भवारी
