जान्हवी अन् आर्याचं कडाक्याचं भांडण; नेमकं झालं तरी काय?
Bigg Boss Marathi Day 45 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन 44 दिवस पूर्ण झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून सदस्यांच्या भांडणांना सुरुवात झाली आहे. आता या वादाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढ असल्याचं स्पष्ट दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात जान्हवी आणि आर्याचं कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. नेमकं काय झालं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, जान्हवी आर्याला म्हणत आहे,”तुला वॉशरुम साफ करता येत नाही… भांडी घासता येत नाही…करता काय येतं मग तुला?”. त्यावर आर्या जान्हवीला म्हणते,”तू स्वत: पहिले क्लिन कर”. जान्हवी पुढे म्हणते,”मला चूक दिसली तर दिसली आर्या. तुला घाणेरड्यासारखं राहायला आवडतं तर घाणेरड्यासारखचं राहा”.
‘बिग बॉस मराठी’ च्या या सिझनची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात काय घडतं, काय बिघडतं हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे सांगता येत नाही.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
