Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये; पार पडला दिमाखदार केरळ महोत्सव !!

पुणे : केळीचे खुंटनारळाच्या झावळ्यातोरण व फुकलम (फुलांची रांगोळी) यांनी सजवलेले बालगंधर्व रंगमंदिर आणि रंगमंदिरात चेंदमेलमगणेश वंदनमभरतनाट्यमशास्त्रीय आणि अर्ध शास्त्रीय नृत्यगाणीतिरुवथिरकली लोकनृत्यमोहिनीअट्टम आदी नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीची दर्शन घडवणारा केरळ महोत्सव पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संपन्न झाला. पुणे शहर व जिल्ह्यातील केरळवासियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दि. ०८ सप्टे. रोजी सायंकाळी केरळ महोत्सव उत्साहात साजरा  झाला.

पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचे चेअरमेन विनोदचंद्र मेनन, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, समन्वयक बाबू नायर, टी.डी. जॉनी, टी.पी. विजयन, आर नायर, साहनी नवशाद आदींचा हस्ते दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केरळ महोत्सव सातत्याने आयोजित करून राष्ट्रीय एकात्मता साधली याचे विनोदचंद्र मेनन यांनी कौतुक केले.

यावेळी पुणे जिल्ह्यातील केरळ वासियांचा मुले व मुली कलावंतांनी केरळचे संस्कृतीचे दर्शन घडवणारे बहारदार नृत्याविष्कार सादर केले. त्याचबरोबर ओप्पाना (मुस्लिम एथनिक नृत्य) आणि मोर्गमकली (ख्रिश्चन एथनिक नृत्य) हे नृत्याविष्कार सादर करून केरळ संस्कृतीतील धार्मिक सलोख्याचे मनोहारी दर्शनही घडवले.

पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या ३२ संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले. यामध्ये हिंदूमुस्लिमख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखविणारे नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना विशेष आनंद मिळाला. या सर्व कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्ह्यातील २०० हून अधिक केरळी युवक व युवती कलावंत सहभागी झाले होते.

महाराष्ट्रासारखी कर्मभूमी व केरळ सारखी मातृभूमी यांच्यात बंधुभाव वाढावा असा प्रयत्न यातून केला गेला आहे, असे पुणे मल्याळी फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजन नायर यांनी सांगितले. तसेच वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्यांना १ मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. कार्यक्रमास पुण्यातील केरळ वासियांनी मोठी गर्दी केली होती.

३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असूनपंचशीलसुमा शिल्प लि. , भारत फोर्ज आणि  नॅशनल एग्ज को–ऑर्डीनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिवर्सिटीबढेकर ग्रुप ,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्युट हे उपप्रायोजक आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading