Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

“घोडा लावायचा नाही रे… ” सुरजच्या लग्नाचे घनश्यामला टेन्शन

Bigg Boss Marathi New Season Day 41 : ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व चांगलेच गाजाताना आपल्याला दिसत आहे. या नव्या पर्वावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. तसेच बिग बॉसच्या घरात सदस्स एकमेकांवर प्रेम ही करतात आणि टास्कमध्ये एकमेकांविरोधत उभे देखील राहतात.

आजच्या भागात गार्डन एरियात सुरज आणि घनश्याम यांच्यामध्ये सुरजच्या लग्नाची चर्चा होत आहे. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. घनश्याम सुरजला म्हणतोय की, ” तूझ्या लग्नात करवला नको का? मग मी आहे ना.. मग तूझ्या लग्नात आपल्याला तूझ्या आवडीचे कपडे घ्यायला लागणार. आम्हाला वहिनी पाहिजे बाबा.. मेकअप करायला.. आम्हाला हक्काची वहिनी हवी आहे. तुला एवढे शॉपिंगचे समजत नाही आमची वहिनी आम्हाला सांगेल भाऊजी ही बूटे घ्या. तुझ लग्न एकदम दणक्यात करायचे. डिजे लावायचा, घोडा लावायचा… त्यावर सुरज म्हणतो, “घोडा लावायचा नाही.. घोडा नाचवायचा रे.” नंतर घनश्याम म्हणतो ,”अरे घोडा असा आणायचा त्यावर तू बसायचे. घोडा असा मस्त नाचनारा असला पाहिजे..फक्त तुला पाडले नाही पाहिजे. सगळा खर्च आपण करू. नवरीकडच्या लोकांनी खर्च नाही केला तरी चालेले आणि सगळ्यांत महत्वाचे वहिनी आम्ही ठरवणार तू नाही ठरवायची. आम्ही बघू आम्हाला वहिनी कशी हवी ते. ” घनश्याम सुरजला विचारतो की, “तुझ्या लग्नात मी किती दिवस आधी येऊ?” त्यावर सूरज म्हणतो, ” एक महिना आधी ये तू. घालू मस्त राडा आपण. “

आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये घनश्यामला सुरजच्या लग्नाची किती काळजी आहे. हे आपल्याला पाहता येईल. बिग बॉसच्या घरात अश्या अनेक गमंती -जमंती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहात राहा. BIGG BOSS मराठी, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading