Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

भारतात अनेक सिंगापूर बनविण्याची आपली इच्छा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिंगापूर:  सिंगापूर हा प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणा आणि आदर्श आहे. भारतात अनेक सिंगापूर बनविण्याची आपली इच्छा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. 

पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूरच्या संसदेत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, माहिती सुरक्षा, उत्पादन क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक क्षेत्रात दोन्ही देशांनी सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. 

या बैठकीनंतर बोलताना मोदी म्हणाले की, सिंगापूर हा केवळ भारताचा जवळचा भागीदार नाही, तर सर्वच विकसनशील देशांसाठी सिंगापूर हा आदर्श आहे. भारत आणि शिंगणापूर या दोन्ही देशातील मंत्रिस्तरीय गोलमेज परिषद ही द्विपक्षीय सहकार्याची पथदर्शी यंत्रणा ठरली आहे. आपल्याला भारतात अनेक सिंगापूर घडवायचे असून त्यासाठी दोन्ही देश सहकार्याने मार्गक्रमणा करतील, असेही मोदी म्हणाले. 

मोदी आणि वांग यांच्या भेटीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्याचे करार करण्यात आले आहेत. विशेषतः आगामी काळात महत्त्वाच्या ठरणाऱ्या सेमीकंडक्टर तंत्रज्ञानसह आरोग्य सेवा, कौशल्य विकास आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य कराराचा त्यात समावेश आहे.

भारत आणि सिंगापूर यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याला पुढच्या वर्षी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आयोजित करण्याच्या कार्यक्रमानबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारत आणि सिंगापूर यांच्या परस्पर संबंधात सांस्कृतिक क्षेत्राचा महत्वाचा सहभाग आहे. ही बाब लक्षात घेऊन भारताचे तिरुवल्लूर सांस्कृतिक केंद्र सिंगापूर येथे स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा ही मोदी यांनी केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading