आज ‘बिग बॉस मराठी’च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी कंटेन्डरची बस
Bigg Boss Marathi New Season Day 40 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच नाविन्य पाहायला मिळतं. घरातील सर्व सदस्यांच्या खेळात नेहमीच कल्ला, राडा, गोंधळ आणि धिंगाणा पाहायला मिळतो. पण प्रत्येक सदस्याचा नवा गेम मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आज ‘बिग बॉस मराठी’च्या स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटणार आहे.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आज बिग बॉस मराठीच्या स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटलेली दिसून येत आहे. दरम्यान घरातील सदस्य बसमध्ये बसण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. अंकिता पॅडी दादाला विचारतेय,”गणपतीत कोकणात जाण्यासाठी तिकीट कनफॉर्म करू का?”. यावर उत्तर देत पॅडी दादा त्यांचं बुकिंग झाल्याचं सांगतात. दुसरीकडे अरबाज म्हणतोय,”घन:श्यामपेक्षा मी कॅप्टनसी चांगली करू शकतो”. त्यावर अभिजीत म्हणतो,”घन:श्याम कॅप्टन का होऊ शकत नाही?”.
कॅप्टनसी कंटेन्डरची बस कधी सुटणार? या बसमध्ये प्रवासी काय धुमाकूळ घालणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार हेदेखील पाहावे लागेल.
BIGG BOSS मराठी, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #BBM
