“अरबाजमागे उभे राहून आम्हाला हेच पांग फेडायला…… “वर्षाताई म्हणतायत अभिजीतला
Bigg Boss Marathi Day 39 : ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली असून टीम A आणि टीम B मधल्या सदस्यांनी खेळण्याची पद्धत बदलेली दिसून येत आहे. या सगळ्याचा परिणाम प्रत्येकाच्या खेळण्यावर दिसणार आहे.
आज प्रदर्शित झालेल्या व्हिडिओत आपण बघू शकतो की वर्षाताई अभिजितशी म्हणतात, “अरबाजमागे आम्ही उभे राहिलो तरीही हेच पांग फेडायला लागले त्याला वाटतं की तो टॅग पुसून टाकणार आहे. त्यावर अभिजित वर्षाताईला म्हणतो, अरबाजने पहिलं पाऊल पण चिखलात टाकलं आणि दुसरं पण पाऊल चिखलातच टाकतो आहे. हे सगळं अरबाज ऐकलं आणि निक्की म्हणाली, “मी अभिजीतच्या विरुद्ध आहे.”
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात अजून काय काय आपल्याला पाहायला मिळेल. अरबाजने अभिजितचं आणि वर्षाताईंचं बोलणं ऐकलं असेल तर त्याची पुढे प्रतिक्रिया काय असेल. निक्की अभिजित विरुद्ध काय गेम प्लॅन करेल. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
