Sunday, June 7, 2026
Latest NewsTECHNOLOGY

सोनी इंडियातर्फे अत्याधुनिक E PZ 16-50mm F3.5-5.6 OSS II लेन्ससह  ZV-E10 II व्ह्लॉगिंग कॅमेरा लाँच

 

सोनीच्या झेडव्ही सीरीजमधील नवीन एपीएस- सी कॅमेरा घेऊन येत आहे  सर्वाधिक पसंतीची वैशिष्ट्ये आणि अपडेट्स

नवी दिल्ली२७ ऑगस्ट २०२४ – सोनी इंडियाने ZV-E10 कॅमेऱ्याची नवी आवृत्ती ZV-E10 II लाँच केली आहे. मूळ ZV-E10 हा सोनी ZV कंटेंट क्रिएशन कॅमेरा मालिकेतील मुख्य APS-C कॅमेरा असून तो कोणत्याही पातळीवरील कंटेंट क्रिएटर्ससाठी सोपे, आटोपशीर, वैविध्यपूर्ण टुल आहे. नवीन ZV-E10 II मध्ये क्रिएटर्सना मूळ कॅमेऱ्याची आवडणारी सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली असून त्यात क्रिएटिव्ह लुक्स, प्रॉडक्ट शोकेस सेटिंग, बॅकग्राउंड डिफोकस फंक्शन आणि भिन्न कोनातून होणारे फ्लिप स्क्रीन यांचा समावेश आहे. हा कॅमेरा वापरण्यास सोपा आणि दर्जेदार परिणाम मिळवून देणारा आहे.

ZV-E10 II चे अंतर्गत हार्डवेयर त्याआधीच्या उत्पादनाच्या तुलनेत उंचावण्यात आले असून त्यात अद्ययावत २६ मेगापिक्सेल (एमपी) (अंदाजे प्रभावी) Exmor R™ CMOS सेन्सर व सोनीचे नवीन BIONZ XR™ इमेज प्रोसेसिंग इंजिन समाविष्ट करण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आणखी काही अतिरिक्त अप़ेट्समध्ये सुधारित ऑटोफोकस आणि व्हिडिओ कॅप्चरिंग क्षता – सिनेमॅटिक व्ह्लॉग सेटिंग, नवीन व्हर्टिकल फॉरमॅट युजर इंटरफेज (युआय) आणि अद्ययावत, जास्त क्षमतेची बॅटरी सोनी झेड बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे लाइव्ह स्ट्रीमिंग व डेटा ट्रान्सफरसाठी जास्त चांगला स्टॅमिना व कनेक्टिव्हिटी मिळते. हे टुल आटोपशीर, वजनास हलके, क्रिएटरच्या हातात सहजपणे मावणारे आणि अंदाजे ३७७ ग्रॅमचे आहे.

त्याशिवाय E PZ 16-50mm F3.5-5.6 OSS II (SELP16502), आटोपशीर APS-C पॉवर झूम लेन्स स्वतंत्रपणे उपलब्ध (लवकरच घोषित करणार) किंवा ZV-E10 II लेन्स किटचा भाग म्हणून लाँच केली जाणार आहे. हा अद्ययावत किट लेन्स पहिल्या मॉडेलच्या तुलनेत वजनास हलका आणि सुधारित ऑटोफोकस (एएफ) तसेच व्हिडिओ परफॉर्मन्स देणारा आहे.

स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ अस्थेटिक्स तयार करा

ZV-E10 II मध्ये क्रिएटिव्ह लूक्स आणि सिनेमॅटिक व्ह्लॉग सेटिंग या दोन महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला असून ते थेट कॅमेऱ्यात प्रीमियम दिसणारा कंटेंट तयार करण्यासाठी खास बनवण्यात आले आहेत. व्हिडिओ आणि इमेजेस काढताना युजर्सना लगेच या इमेजेस सुधारण्यासाठी दहा पर्याय देण्यात आले आहेत – स्टँडर्ड (एसटी), पोट्रेट (पीटी), न्यूट्रल (एनटी), व्हिव्हिड (व्हीव्ही), व्हिव्हिड २ (व्हीव्ही२), फिल्म (एफएल), इन्स्टंट (आयएन), सॉफ्ट हायस्काय (एसएच), ब्लॅक अँड व्हाइट (बीडब्ल्यू) आणि सेपिया (एसई) यांचा समावेश आहे. ZV-E10 II मुळे क्रिएटर्सना प्रीमियम, सिनेमॅटिक व्हिडिओ कंटेंट सिनेमॅटिक व्ह्लॉग सेटिंग वापरून एकाच टचमध्ये बनवता येतो. हे वैशिष्ट्य अस्पेक्ट रेशिओ, फ्रेम रेट आणि एएफ ट्रान्झिशन स्पीड या सर्व बाबी सिनेमॅटिक व्हिडिओ काढण्यासाठी ऑटोमॅटिकपणे अडजस्ट करते.

सहजपणे कंटेंट निर्मिती करण्यासाठी अतिरिक्त वैशिष्ट्ये

बॅकग्राउंड डिफोकस हे वैशिष्ट्य फील्ड डेप्थ अडजस्ट करण्यासाटी आणि एकाच टचमध्ये बॅकग्राउंडवर बोके इफेक्ट तयार करण्यासाठी देण्यात आले आहे.

फेस प्रायोरिटी ऑटो- एक्सपोजर लगेच चेहरे ओळखून उजळपणासाठी ऑटोमॅटिकपणे एक्सपोजर अडजस्ट करते. प्रकाश बदलत असला, तरी हे एक्सपोजर आपोआप अडजस्ट होत राहाते.

सॉफ्ट स्किन इफेक्टमुळे बाह्य रूप सफाईदार होतो आणि त्वचेवरील काळे डाग कमी होतात.

आधुनिक, ऑनबोर्ड ३- कॅप्सूल मायक्रोफोन आणि सिलेक्टेबल डायरेक्टिव्हिटीसह (पूर्वी ZV-E1 नाव असलेले) देण्यात आले आहे. त्यामुळे स्पष्ट, उच्च दर्जाचा ऑडिओ काढता येतो. युजर्सना वातावरण किंवा रेकॉर्डिंग ऑडिओनुसार ऑटो किंवा फ्रंट किंवा रियर अथवा ऑल डिरेक्शन्स यापैकी निवड ऑडिओ डिरेक्टिव्हिटीसाठी करता येते.

उपलब्धता आणि किंमत:

नवीन ZV-E10 II कॅमेरा आणि E PZ 16-50mm F3.5-5.6 OSS II लेन्स किट (लवकरच घोषणा करणार) सोनीची सर्व सेंटर्स, अल्फा फ्लॅगशीप स्टोअर्स, www.ShopatSC.com, पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स, ईकॉमर्स वेबसाइट्सवर (अमेझॉन आणि फ्लिपकार्ट) २७ ऑगस्ट २०२४ पासून उपलब्ध केला जाणार आहे.

मॉडेल एमआरपी (रुपये) उपलब्धतेचा दर
ZV-E10M2 (बॉडी ओन्ली) 94,990/- २७ ऑगस्ट २०२४ पासून
ZV-E10M2K (मॉडी + 16-50mm पॉवर झूम लेन्स, SELP16502) लवकरच घोषणा लवकरच घोषणा

 

या खास ऑफरचा एक भाग म्हणून सोनीतर्फे अतिरिक्त लाभ दिले जातात. त्यात ३ वर्षांची वॉरंटी (२ वर्षांची नियमित + १ वर्ष उत्पादन नोंदणीव), मोफत एसडी कार्ड यांचा समावेश आहे.

(SF-E64A), कॅरी बॅग (MII-HD1) आणि सुलभ वित्त योजना.

.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading