रितेश भाऊ सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता; पाहा भाऊचा धक्का न चुकता
Bigg Boss Marathi New Season Day 35 : ‘बिग बॉस मराठी’चा हा पाचवा आठवडा चांगलाच गाजला. गेल्या आठवड्यात रितेश भाऊंनी चक्रव्ह्यू दाखवल्यानंतर काही नात्यांची चक्र गरागर फिरली. जोड्यांच्या बेडीत सदस्य बांधले गेले. काही जोड्या चांगल्या गाजल्या. या आठवड्यात सदस्यांना एक भयचकित धक्का मिळाला. घरात एक रहस्यमय पाहुणा अवतरला. सोन्याची नाणी मिळवताना सदस्यांचा गेम झाला. आता आज भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा घेण्यासाठी सज्ज आहे.
‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश भाऊ आज सदस्यांची चांगलीच कानउघडणी करणार आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,”बिग बॉस मराठी’च्या घराला भूताने झपाटलं… काहींच्या अंगात जिंकण्याचं वारं भरलं..याच नादात सगळ्यांचं काहीतरी चुकलं. सगळ्यांचाच हिशोब करुयात चुकता.. बघा भाऊचा धक्का न चुकता”.
बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात सदस्यांना त्यांच्याच मित्रांचे खरे चेहरे दिसले आहेत. आता सदस्यांची खेळण्याची पुढची चाल काय असेल याकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे. तसेच आजचा भाऊचा धक्काही खास असणार आहे.
‘BIGG BOSS मराठी’, UNSEEN UNDEKHA पाहा @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
