‘बिग बॉस मराठी’च्या घरात फक्त रिअॅलिटी चालते” : रितेश देशमुख
‘बिग बॉस मराठी’च्या घरात दर आठवड्याला नवा खेळ आणि नवी समीकरणं पाहायला मिळतात. येणाऱ्या ट्विस्टमुळे अनेकांचा खेळ बदलला. आठवड्यात काहींचा तोंडावरचा ताबा सुटला. दोन सदस्य विरोधात इतर सदस्य असं इक्वेशन आठवडाभर पाहायला मिळालं. आज ‘भाऊच्या धक्क्या’वर या बदललेल्या इक्वेशनवर चर्चा होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरात फक्त रिअॅलिटी चालते, असं म्हणत रितेश भाऊ अरबाजची कानउघडणी घेताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात जोडीचा मामला होता. ‘बिग बॉस’ने घरात जोड्या पाडल्या होत्या. निक्की आणि अभिजीतची एक जोडी होती. दोन जणांना 10 सदस्य टार्गेट करताना दिसून आले. अरबाजने निक्कीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि दुष्मन का दुष्मन दोस्त म्हणत अरबाज सर्वांनाच आवडू लागला. अरबाजच्या आतापर्यंतच्या चुकांकडे घरातील सदस्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावर याबद्दल बोलताना दिसणार आहे.
भाऊच्या धक्क्यावर आज रितेश भाऊ अरबाजला निक्कीने अभिजीतसोबत केलेली कोणती गोष्ट आवडली नाही? हा प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर अरबाजचं उत्तर जाणून घेतल्यानंतर रितेश भाऊ त्याला भाऊच्या चक्रव्युहात घेऊन जाणार आहे. रितेश म्हणतोय,”तुम्ही निक्कीच्या बाजूने आहात..त्यांच्या फेव्हरमध्येच आहात हेच मी आता दाखवणार आहे. अरबाज तुम्ही रिअॅलिटी शो केले आहेत. पण हा ‘बिग बॉस मराठी’ आहे. इथे फक्त रिअॅलिटी चालते”. सगळ्यांना सत्य कळल्यासाठी भाऊच्या धक्क्यावर रितेशने चक्रव्युहू रूम उघडली आहे.
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka #Promo
