पंतप्रधानांची माफी नेमकी कशा बद्दल (?)काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे – दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन शिव छत्रपतींची माफी नेमकी कशा बद्दल (?) मागितली असा सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
… शिव छत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या ८ वर्षांच्या अक्षम्य दिरंगाईबद्दल, वा भाजप’च्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती विषयी अनादर व्यक्त केल्या बद्दल वा राज्यपाल कोश्यारींकडून व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदीं कडुन शिवाजी महाराजांचा व महाराष्ट्राच्या अस्मितांचा वारंवार अवमान व हेळसांड केल्या बद्दल
दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी माफी मागितली याचा खुलासा झालेला नसुन.. मोदी साहेबांनी माफी नेमकी कशा बद्दल (?) मागितली याचा खुलासा होणे.. गरजेचे असल्याचे प्रतिवादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आज एका वाहीनीवरील चर्चेत सांगितले.
महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्या समोर ठेऊन प्रधान मंत्री मोदी लगबगीने आले खरे…मात्र आपल्या हस्ते अनावरण झालेल्या शिव छत्रपतींच्या ‘कोसळलेल्या पुतळ्याबद्दल’ त्यांचे कडून चिड, खंत, ऊद्देग वा संतापाची भावना व्यक्त होतांना मात्र दिसली नाही.. वा या अक्षम्य हेळसांड व बेजबाबदार पणा बद्दल कठोर शासन करण्याची भावना देखील प्रगट झाल्याचे राज्यातील जनतेस पहावयास मिळाले नाही अशी पुस्ती ही त्यांनी जोडली..!
कोट्यावधींच्या भ्रष्टाचारी मार्गाने झालेला पुतळा कोसळल्या बद्दल वा पुन्हा ‘नविन पुतळ्याच्या नावे पुन्हा भ्रष्टाचाराची संधी मिळण्यासाठी’ (?) जनतेचा राग शांत होऊन.. अनुकुल वातावरण तयार होण्या बद्दल #भाषणजीवी मोदीं नी माफी मागितली काय (?) असा उपहासात्मक सवाल ही त्यांनी केला.
राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेवरील घाव घालणारी, शरमेची व निंदनीय असुन, शिव छत्रपतीं बद्दल टोकाची अनास्था व असुया व्यक्त करणारी असल्याचा घणाघात ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
“शिव छत्रपतींचे चेहऱ्यावर त्यांचे वरील घातकी हल्याचा वण दाखवणे”, हे देखील शिव छत्रपतीं विषयी टोकाची अनास्था व हेटाळणी करण्याजोगेच असल्याने त्या विषयी मोदींनी काय चिड व्यक्त केली..?
राजकोट येथील पुतळ्यास महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता कशी दिली..? कोट्यावधीचा पुतळा बनवण्यासाठी तज्ञ शिल्पकारांकडून निविदा का मागवली गेली नाही…? एवढ्या अल्प कालावधीत पुतळा कसा तयार केला गेला…? या सर्वांची सखोल ‘न्यायालयीन चौकशी’ करण्याची धोषणा देखील भाषणजीवी मोदींनी का केली नाही…?
तसेच ‘राज्याची – सत्ता’ शहेनशहांच्या दावणीला बांधलेल्या त्रिकुट सरकार कडून महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण काय खात होणार..! असे संतप्त उदगार ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले ..!
