आरबीआय डेप्युटी गर्व्हनर यांच्यातर्फे जीएफएफ २०२४ येथे एटीएम पायाभूत सुविधा उंचावण्यासाठी उत्पादनांचे अनावरण
आरबीआयच्या एक्झक्युटिव्ह संचालकांतर्फे एबीबीएलच्या बीबीपीएस प्लॅटफॉर्मचे भारत कनेक्टमध्ये रिब्रँडिंग करणार असल्याची घोषणा
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गर्व्हनर टी. राबी संकर यांनी आज देशातील एटीएम पायाभूत सुविधांमध्ये क्रांती आणण्यासाठी उत्पादने लाँच करत असल्याची घोषणा केली. ग्लोबल फिनटेक फेस्टच्या (जीएफएफ) २०२४ सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये युपीआय इटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (युपीआय- आयसीडी) आणि डिजिटल बँकिंग युनिट्स (डीबीयू) दर्शवणाऱ्या बँकांचा समावेश आहे.
युपीआय आयसीडीमुळे ग्राहकांना बँक आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्सद्वारे (डब्ल्यूएलएओ) चालवल्या जाणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही बँक खात्याचा युपीआय देऊन, प्रत्यक्ष कार्ड नसतानाही एटीएम्समध्ये रोख पैसे डिपॉझिट करता येतील. ही एटीएम्स कॅश रिसायकलर्स मिशन्स असून ती डिपॉझिटसाठी तसेच पैसे काढण्यासाठीही वापरता येतात. युपीआयला लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकाच्या मदतीने व्हर्च्युअल पेमेंट अड्रेसेस (व्हीपीए) आणि अकाउंट आयएफएससीज वापरून ग्राहकांना रोख पैसे डिपॉझिट करता येत असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सफाईदार, सर्वसमावेशक आणि सहज उपलब्ध होईल. ग्राहकांना ही वैशिष्ट्ये टप्प्याटप्प्याने लाँच झाल्यानंतर वापरता येतील.
ओपन आर्किटेक्चर असलेली एटीएम मशिन्स बँक अप्स होस्ट करून त्यांना कॅश डिपॉझिट, विड्रॉवल आणि बँक खाती उघडणे, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे, निश्चित ठेव ठेवणे, सेफ डिपॉझिट लॉकर्स अशा प्रकारच्या इतर बँकिंग सेवा देणाऱ्या डीबीयूप्रमाणे वापर करता येईल.
त्याशिवाय जीएफएफ २०२४ मध्ये आरबीआयचे कार्यकारी संचालक विवेक दीप यांनी भारत बिल पेमेंट सिस्टीमचे (बीबीपीएस) भारत कनेक्टमध्ये रुपांतर करत असल्याची घोषणा केली. बीबीपीएस ब्रँड आणखी मजबूत करण्यासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. भारत कनेक्टमध्ये एनपीसीआयच्या भारत बिलपे लिमिटेडची (एनबीबीएल) मूल्ये आणि भागधारक व ग्राहकांप्रती समान व्हिजन ठेवण्यात आले आहे, जे बिल पेमेंट यंत्रणेपलीकडे जात वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर जोडणारी यंत्रणा सर्वसमावेशक प्लॅटफॉर्मद्वारे तयार करते.
हे लाँच अजय कुमार चौधरी, नॉन- एक्झक्युटिव्ह अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक, एनपीसीआय यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
