Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

निक्की-अरबाज पुन्हा एकत्र येणार; नवा गेम प्लॅन तर नाही ना?

Bigg Boss Marathi Day 34 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन विविध कारणांनी चर्चेत आहे. सध्या घरात टीम ए च्या सदस्यांमध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे. याबरोबरच निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दोघांमध्ये मोठी भांडणे झालेली गेल्या काही भागात दिसले होते. पण कालच्या भागात मात्र दोघांनी एकमेकांसोबत बोलून त्यांच्यातील दुरावा कमी केल्याचं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमो मध्ये अरबाजने काचेवर “I Miss You” लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर तो हार्टदेखील काढतो. निक्कीपासून दुरावणं अरबाजला सहन होत नसल्याचं प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. तर अरबाजला आर्याचा मात्र चांगलाच पाठिंबा मिळत आहे.

आता निक्की आणि अरबाज यांच्यातील नाते पूर्ववत होणार का, पुढच्या खेळात ते एकमेकांबरोबर कसे राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच टीम ए मधील जान्हवी आणि वैभव यांना हे मान्य असेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading