सगळे जाणार पाताळलोकात शोधायला सोन्याची नाणी, कोण कोणावर पडणार भारी?
Bigg Boss Marathi New Season Day 33 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी काय राडा होईल सांगता येत नाही. आज घरातील सर्व मंडळी पातळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार आहेत. यात कोण कोणावर भारी पडणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. टीम A विरुद्ध टीम B असा हा टास्क पार पडणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज कमाल टास्क पार पडणार आहे. प्रोमोमध्ये म्हटलं जात आहे,”पाताळलोकात सदस्यांना शोधावी लागणार सोन्याची नाणी”. दरम्यान टास्कमध्ये अरबाज आर्याला म्हणतोय,”आर्या आपले कमी आहेत..लवकर नाणी आण”. दरम्यान कॅप्टन निक्की मात्र टीम B ची नाणी वॅलिड नाही असं म्हणते. यावर डीपी दादा म्हणतात,”खायला अन्न मिळणार आहे त्या करन्सीवर”. तर अभिजीत म्हणतो,”यापुढे मला पार्टनर बनयाचं नाही”.
अभिजीतच्या या निर्णयावर घरातील इतर सदस्य त्याचं कौतुक करत त्याला सॅल्युट देताना दिसून येतात. अभिजीत आणि निक्कीची एक जोडी होती. पण आता अभिजीतला निक्कीचा खेळ पटत नसल्याने त्याने तिला सोडलं असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
