Monday, November 9, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधानसभा निवडणूक 2024 : भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात

नागपूर : लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र सह चार राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक प्रचार मोहिमेत संघाचा सहभाग असणार आहे. निवडणूक प्रचार मोहीम राबवताना प्रस्थापित नेत्यांबरोबरच तरुण चेहऱ्यांनाही पुढे आणण्याचा मंत्र संगाने भाजपला दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा येणाऱ्या भाजपाकडून पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अवहेलनाच करण्यात आली. खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीच, भाजपाला आता संघाची गरज उरलेली नाही, असे विधान केले. त्यामुळे संघ या निवडणुकीत तटस्थ राहिला. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका सहन करावा लागला. विशेषतः या आधीच्या निवडणुकीत भाजपला निर्विवाद यश मिळवून देणारे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यात पक्षाला मोठा फटका बसला.

या पार्श्वभूमीवर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आले असताना भाजपाने संघाशी जुळवून घेण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार संघ आणि भाजप यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या वतीने ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह आणि संघाच्या वतीने सह कार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दोघांकडून समजूतीचे धोरण अंगीकारले गेल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये भाजपला सहकार्य करण्याचे संघाचे धोरण असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रासह चर राज्यांमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार मोहीम राबविताना प्रस्थापित नेत्यांबरोबर पक्षातील तरुण नेत्यांना प्राधान्याने सहभागी करून घ्यावे. त्याचा सकारात्मक परिणाम मतदानावर दिसून येईल, असा मंत्र संघाने भाजपला दिला आहे.

Leave a Reply