Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

शिवाला मिळाली गाडी आणि अंगण साफ करायची शिक्षा !

 

वस्तीत दहीहंडी साजरी करून शिवा आणि आशू घरी येतात. आशु, शिवाचा जीव वाचवून तिला घरी आणतो. पण घरी येताच सिताई शिवाला शिक्षा देते आणि घरातील गाड्या आणि अंगण स्वच्छ करायला लावते. शिवा वस्तीत जाऊन पुन्हा आपल्या शिवा कपड्यांमध्ये येऊन दहीहंडी फोडते म्हणून सिताई शिवाशी अबोला धरते. शिवाचे सीताईला मनवायचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. शिवा डोसा बनवते आणि त्याच्यावर चटणीने सॉरी लिहते. सिताईला हे आवडत नाही. शिवा असे कपडे इथुन पुढें कधीचं घालणार नाही असे वचन सिताईला देते. शिवा सिताई बरोबर भाजी मार्केट मध्ये जाते तेंव्हां तेथील व्यापारी गुंड हप्तावसुली करत असल्याचं शिवाला कळत. शिवा सिताईच्या नजरेत न येता गुंडांना धडा शिकवते. वस्तीतील शाळेची पडझड झाल्याने शाळा बंद पडणार आहे हे जेव्हा शिवा कळत ती शाळेची मदत करायची ठरवते. शिवाला मदत करताना पाहून, आशू शिवाला मदत करायची ठरवतो. या सगळ्यामुळे शिवा आणि सिताईच्या नात्यात गोडवा येईल ? यासाठी बघायला विसरू नका ‘शिवा’ सोम ते शुक्र रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading