सामाजिक कार्यासाठी लायन्स क्लब सदस्यांकडून २५ लाख जमा
पुणे : डेक्कन कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब च्या ३२३ डी -२ प्रांताच्या कॅबिनेटचा स्थापना समारंभ पार पडला. कॅबिनेट स्थापनेच्या समारंभासाठी आंतरराष्ट्रीय द्वितीय अध्यक्ष मार्क लियोन सपत्नीक उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यासाठी लायन्स क्लब सदस्यांकडून २५ लाख निधी जमविण्यात आला. गरजू मुलांचे शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
या समारंभात ३२३ डी -२ चे प्रांतपाल लायन विजय सारडा, उप प्रांतपाल १ राजेश आगरवाल, उप प्रांतपाल २ श्रेयस दिक्षित व समस्त कॅबिनेट अधिकारी यांना माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन प्रवीण छाजेड यांनी शपथ दिली. या समारंभास मल्टीपल प्रांताचे अध्यक्ष सुनील देसरडा, माजी प्रांतपाल विजय भंडारी, गिरीश मालपाणी, प्रांत सचिव रवींद्र गोलार, प्रांत खजिनदार विजय जाजू , प्रांत व्यवस्थापक आर.के.शाह व अनेक पूर्व प्रांतपाल उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण समाज उपयोगी कामे करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश यावेळी मार्क लियोन यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्रांतपाल राजेंद्र मुच्छाल यांनी केले.
