Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

दोन दिवसीय आयटीसी मिनी संगीत संमेलनाचे आयोजन

पुणे : पुण्यातील मित्र फाउंडेशन आणि कलकत्ता येथील आयटीसी संगीत रिसर्च अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार दि. २४ ऑगस्ट आणि रविवार दि २५ ऑगस्ट रोजी आयटीसी मिनी संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि २४ व २५ ऑगस्ट दोन्ही दिवशी एरंडवणे येथील डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृह या ठिकाणी दोन्ही दिवशी सायं ५.३० वाजल्यापासून सदर संमेलन संपन्न होणार असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. सभागृहातील काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी तरुण गायिका संगबोर्ती दास यांचे ख्याल गायन संपन्न होईल तर उत्तरार्धात पंडित उदय भवाळकर यांचे धृपदगायन रंगेल. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात परमानंदा रॉय यांच्या बासरी वादनाने होईल. तर ज्येष्ठ गायक पं उल्हास कशाळकर यांच्या गायनाने या दोन दिवसीय संमेलनाचा समारोप होईल, अशी माहिती मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनंजय गोखले यांनी दिली.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संमेलनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ कथक गुरु श्रीमती प्रभाताई मराठे यांना मित्र फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करीत त्यांचा सन्मानित करण्यात येईल. रोख रुपये २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

महोत्सवामध्ये पं योगेश समसी, मिलिंद कुलकर्णी, अमेय बिचू, स्वप्नील भिसे, प्रताप आवाड, रोहित देव आदी कलाकार साथसंगत करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading