पीएमपीएमएल कडून डेक्कन जिमखाना ते पिंपळे निलख बससेवा पूर्ववत सुरू
पुणे : पीएमपीएमएल कडून बसमार्ग क्रमांक ९३ – डेक्कन जिमखाना ते पिंपळे निलख हा बसमार्ग प्रवाशी मागणीनुसार पूर्ववत सुरू करण्यात आला असून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनांक १५/०८/२०२४ रोजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते या बसमार्गाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकरराव जगताप, सचिन साठे, नितीनशेठ इंगवले व बालेवाडी डेपो मॅनेजर श्री. सुनिल दिवाणजी
यांची प्रमुख उपस्थिती होती.
बसमार्ग क्रमांक ९३ – डेक्कन जिमखाना ते पिंपळे निलख या बससेवेचा मार्ग फर्ग्युसन कॉलेज, मनपा काँग्रेस भवन, सिमला ऑफिस, पुणे विद्यापीठ गेट, कस्तुरबा गांधी वसाहत, औंध गांव, औंध हॉस्पिटल, रक्षक चौक असा असणार आहे. या बसमार्गावर पिंपळे निलख ते डेक्कन जिमखाना ८ फेऱ्या व डेक्कन जिमखाना ते पिंपळे निलख ८ फेऱ्या अशा एकूण १६ फेऱ्या होणार आहेत. पिंपळे निलख हून पहिली फेरी सकाळी ०६.१५ वा. तर शेवटची फेरी संध्याकाळी ०७.२० वा. आहे. तसेच डेक्कन जिमखाना पहिली हून पहिली फेरी सकाळी ०७.०० वा. तर शेवटची फेरी रात्रौ ०८.४५ वा. आहे.
सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष सुरेश साठे, रामदास जगदाळे, बाळासाहेब इंगवले, राजेंद्र टकले, अशोक शिंदे, जयवंत रानवडे, बाळासाहेब कामठे, भुलेश्वर नानगुडे, काळूराम नानगुडे, अनिल संचेती, आनंद कुंभार, प्रकाश कामठे, लक्ष्मण दळवी, शिवाजीराव दळवी
यांच्यासह पिंपळे निलख परिसरातील नागरीक उपस्थित होते.
तरी या बससेवेचा लाभ नोकरदार, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक व महिला प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करणेत येत आहे.
