Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

वी ने स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफर्सची घोषणा केली; प्रीपेड ग्राहकांना अतिरिक्त डेटा आणि ओटीटी लाभ मिळणार 

फक्त वी ऍपवर उपलब्ध आहेत एक्सक्लुसिव्ह रिचार्ज ऑफर

 

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वीने आपल्या प्रीपेड ग्राहकांना अतिरिक्त डेटा आणि ओटीटी लाभांसह मर्यादित कालावधीच्या ऑफर्सची घोषणा केली आहे. १३ ते २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत या ऑफर्सचा लाभ घेता येईल. अर्धवार्षिक किंवा वार्षिक पॅकसह रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना यामध्ये विशेष लाभ मिळतील.

दैनंदिन मर्यादेच्या व्यतिरिक्त ३० जीबी ते ५० जीबी मोफत हायस्पीड डेटा हे वी च्या स्वातंत्र्यदिन ऑफरचे खास वैशिष्ट्य आहे. अर्धवार्षिक पॅकसाठी हा अतिरिक्त डेटा ४५ दिवस वैध राहील तर वार्षिक पॅकसोबत अतिरिक्त डेटाचा लाभ ९० दिवस घेता येईल. पॅकचा भाग म्हणून दिल्या जाणाऱ्या दैनंदिन डेटा कोटाच्या व्यतिरिक्त हा अतिरिक्त डेटा दिला जात आहे. २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत या ऑफर लागू राहतील.

याखेरीज वी ने आपल्या वार्षिक पॅकमध्ये डिस्ने+ हॉटस्टार आणि ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सची एक वर्षाची सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट केली आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

वी ऍपमार्फत रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना वार्षिक रिचार्ज पॅक किमतीवर अतिरिक्त सूट मिळवता येईल. ३४९९, ३६९९ आणि ३७९९ रुपयांच्या रिचार्जसाठी युजर्सना अनुक्रमे ५०, ७५ आणि १०० रुपयांची सूट मिळवता येईल.

याशिवाय वी शॉपमध्ये लोकप्रिय ब्रँड्सची गिफ्ट कार्ड्स मिळवता येतील३० पेक्षा जास्त ब्रँड व्हाऊचर्सवर अतिरिक्त सूट देखील मिळेलयामध्ये झोमॅटो फूड ऑर्डर्सवर सूटपीवीआर मुव्ही तिकिटांवर १०सूटपॅन्टलून्समधील खरेदीवर १२सूट इत्यादींचा समावेश आहेफक्त वी ऍपमध्ये उपलब्ध.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading