Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

घनःश्याम आहे पुढारी, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चालतोय त्याचा लयभारी जलवा

Bigg Boss Marathi New Season Day 19 : बिग बॉसमध्ये आल्यापासून छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे चर्चेत आहे. तो सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्याशी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार!असंही त्याने सगळ्यांना सांगितलं आहे. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात छोटा पुढारी आपला लयभारी जलवा दाखवताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरातील सध्या दुसरा आठवडा सुरू असून या आठवड्यात छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीची चांगलीच मैत्री झालेली दिसत आहे.काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये निक्की घन:श्यामला मिठी मारताना दिसली. तसेच तिने घन:श्यामला गालावर पप्पीदेखील दिली. निक्कीकडून किस मिळताच घन:श्याम च्या चेहऱ्यावर सुंदर हसू फुललं होतं.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्यामने निक्कीचे हिल्स घातलेले दिसून येत आहेत. पुढे निक्की घन:श्यामला हिल्स घालून वावरायला शिकवते. पुढे कंबर हलवत घन:श्याम निक्कीसोबत जलवा दाखवतो”. घन:श्यामच्या या कृतीवर योगिता म्हणते,”काय प्रगती केली आहे…याला म्हणतात पुढारी”.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading