“मी आहे म्हणून टिकलो दुसरा कोणी असता तर …”; कोल्हापूरचा डीपी धनंजय पोवार स्पष्टचं म्हणाला
कोल्हापूरी गडी आणि लोकप्रिय रील स्टार धनंजय पोवारने यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. एक साधा उद्योजक ते रील स्टार असा प्रवास करणाऱ्या धनंजयने आता ‘बिग बॉस मराठी’च्या भव्य मंचावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची तयारी केली असून ते ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चांगलाच खेळ खेळत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाण्याआधी आपल्या प्रवासाबद्दल बोलताना धनंजय म्हणाला,”‘बिग बॉस मराठी’पर्यंत येण्याचा प्रवास माझ्यासाठी आणि इतरांसाठी धक्कादायक आहे. मी आहे म्हणून टिकलो आहे, दुसरा कोणी असता तर त्याचं रामनाम सत्य झालं असतं. कारण ‘बिग बॉस मराठी’ हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. बारा ते पंधरा कोटी लोकांमधून फक्त 15 लोक निवडतात आणि त्या पंधरा लोकांमध्ये मी आहे. आता मला सेलिब्रिटी झाल्याचा फील येतोय.. पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला आहे हे देखील तितकेच खरे आहे.”
धनंजयने आपल्या चाहत्यांबद्दल म्हणाला,”माझा फॅनबेस फक्त पोरांचा नाही तर कुटुंबाचाही आहे. माझे व्हिडिओ घराघरांत पाहिले जातात आणि त्यामुळेच मला खूप मानसन्मान मिळतो. मी माझ्या चाहत्यांना मनापासून धन्यवाद देतो.”
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये धनंजय पोवार कशी चमक दाखवतोय हे पाहाणे उत्सुकतेचे ठरत आहे. ‘बिग बॉस मराठी’ दररोज रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर पाहायला मिळेल.
