Friday, May 15, 2026
BusinessLatest News

एनएसईचे आर्थिक वर्ष २५ मधील पहिल्या तिमाहीतील एकत्रित उत्पन्नात ५१ टक्क्यांची वाढ

वार्षिक पातळी ४,५१० कोटी रुपयांवर

एनएसईच्या आर्थिक वर्ष २५ मधील पहिल्या तिमाहीतील एकत्रित नफ्यात वार्षिक पातळीवर ३९ टक्क्यांची वाढ होऊन २,५६७ कोटी रुपयांवर

एनएसईद्वारे आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीतील देशाच्या अर्थखात्यासाठी १४,००३ कोटी रुपयांचे योगदान व त्यामध्ये एसटीटी/सीटीटीचा वाटा १२,०५४ कोटी रुपये.

प्राप्ती कर २३६ कोटी रुपये, मुद्रांक शुल्क १,०१८ कोटी रुपये

३६२ कोटी रुपये जीएसटी आणि सेबी शुल्क ३३३ कोटी रुपयांवर

एनएसई या भारतातील आघाडीच्या एक्स्चेंजने आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत कामकाजातून ४,५१० कोटी रुपयांचे एकत्रित उत्पन्न मिळविल्याचे जाहीर केले असून, त्यामध्ये वार्षिक पातळीवर ५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. ट्रेडिंग उत्पन्नाशिवाय कामकाजातून मिळालेल्या उत्पन्नाला इतर उत्पन्नांची जोड मिळाली असून, त्यात डेटा सेंटर आणि कनेक्टिव्हिटी शुल्क, क्लियरिंग सेवा, लिस्टिंग सेवा, इंडेक्स सेवा आणि डेटा सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.

ट्रेडिंगचे प्रमाण रोखीच्या बाजारपेठेत १,२२,८७२ कोटी रुपयांचे (वार्षिक पातळीवर १११ टक्क्यांची वाढ) सरासरी दैनंदिन ट्रेडचे प्रमाण (एडीटीव्हीज) नोंदविले गेले, तर इक्विटी फ्युचर्सचा एडीटीव्ही २,०९,२७९ कोटी रुपयांवर (वार्षिक पातळीवर १०१ टक्क्यांची वाढ) गेला आहे. इक्विटी ऑप्शन्स (प्रीमियम मूल्य) एडीटीव्ही आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत ७१,९५७ कोटी रुपयांवर (वार्षिक पातळीवर ३३ टक्क्यांनी वाढून) गेला आहे.

एनएसईने स्वतंत्रपणे आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत एकूण ४,०५१ कोटी रुपयांचे ऑपरेटिंग उत्पन्न नोदविले आहे. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील २,८३३ कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक पातळीवर ४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

तिमाहीच्या दरम्यान एनएसईने स्वतंत्रपणे आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत १,७६२ कोटी रुपयांचा एकूण खर्च नोंदविला आहे. या खर्चापैकी एकूण ४९ टक्के वाटा म्हणजे ८६२ कोटी रुपये सेबी रेग्युलेटरी शुल्क, सेबीच्या आदेशानुसार कोअर एसजीएफसाठी अतिरिक्त योगदान आणि आयपीएफटीसाठी योगदान यांसाठी देण्यात आले.

आर्थिक वर्ष २५च्या पहिल्या तिमाहीत एनएसईने कोअर सेटलमेंट गॅरंटी फंडातील निधी सेबीच्या सल्ल्यानुसार सध्याच्या १०,५०० कोटी रुपयांवरून वाढविण्यासाठी ५८७ कोटी रुपयांचे अतिरिक्त योगदान देण्यासाठी तरतूद केली आहे. कोअर एसजीएफमधील निधी वरील योगदानानंतर ९,७२६ कोटी रुपयांवर जाईल.

ऑपरेटिंग ईबीआयटीडीए पातळीवर एनएसईने स्वतंत्रपणे आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत ५९ टक्क्यांचे ईबीआयटीडीए मार्जिन नोंदविले असून, गेल्या वर्षी याच कालावधीतील हे मार्जिन ६९ टक्के होते.

एनएसईचा स्वतंत्र निव्वळ निफा आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत १,९६० कोटी रुपयांवर गेला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत तो १,५९८ कोटी रुपये होता. स्वतंत्र निव्वळ नफ्याचे मार्जिन ४५ टक्के आहे.

एनएसईद्वारे आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीतील देशाच्या अर्थखात्यासाठी १४,००३ कोटी रुपयांचे योगदान दिले असून, त्यामध्ये एसटीटी/सीटीटीचा वाटा १२,०५४ कोटी रुपये, प्राप्ती कर २३६ कोटी रुपये, मुद्रांक शुल्क १,०१८ कोटी रुपये, जीएसटी ३६२ कोटी रुपये आणि सेबी शुल्क ३३३ कोटी रुपये आहे. १२,०५४ कोटी रुपयांच्या एसटीटीमध्ये ६३ टक्के रोख बाजारपेठेतून आणि ३७ टक्के इक्विटी डेरिव्हेटिव्हज क्षेत्रातून आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading