Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

Union Budget 2024 : अर्थव्यवस्थेला विकसित भारताच्या  दिशेने चालना देण्यावर जास्त भर – बाबा कल्याणी

पुणे : मी माननीय अर्थमंत्र्यांचे त्यांनी मांडलेल्या उल्लेखनीय आणि मूलभूत स्तंभ बळकट करून भारतीय अर्थव्यवस्थेला विकसित भारताच्या  दिशेने चालना देण्यावर जास्त भर देणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत अभिनंदन करतो.

नैसर्गिक शेती आणि शेती उत्पादनक्षमतेवर भर, रोजगार निर्मिती आणि रोजगाराला प्रोत्साहन, एमएसएमईजना चालना देण्यासाठी योजना, शहरांचे आधुनिकीकरण आणि भारताच्या ऊर्जा स्थित्यंतराला चालना देणारी धोरणे यांचा दीर्घकालीन परिणाम होईल आणि सध्या अस्थिर असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक लवचिकता वाढण्यास मदत होईल. मी विशेषत्वाने ‘कौशल्य विकास’ आणि ‘शहरी विकासा’विषयी सरकारची नवी विचारसरणी व दृष्टिकोनाचे कौतुक करतो. या दोन्ही बाबींकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक होते.

पायाभूत सुविधांची निर्मिती हा भारताच्या स्पर्धात्मकतेसाठी थेट योगदान देणारा घटक असून, त्यामुळे गुंतवणुकीसाठी देशाला पसंती मिळण्याचे प्रमाण वाढते. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारचे हे कायमच वैशिष्ट्य राहिले असून, रस्ते, बंदरे, प्लग अँड प्ले इंडस्ट्रीयल पार्क्स, जलसिंचन प्रकल्प व वाजवी गृहप्रकल्पांवर यापुढेही दिला जाणारा भर लक्षणीय आहे. पर्यटनावर देण्यात येत असलेले खास लक्ष स्वागतार्ह असून, त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला विविध प्रकारे लाभ होईल.

अनुसंधान एनआरएफ कार्यान्वित करणे आणि अवकाश क्षेत्रासाठीचे खास साहस भांडवल यांची मी प्रशंसा करतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, खासगी क्षेत्राला व्यावसायिक पातळीवर संशोधन आणि नावीन्य निर्मितीसाठी चालना मिळावी, यासाठी १ लाख कोटी फायनान्सिंग पूलची सुविधा भारताला दीर्घकाळात उत्पादन देणारा देश बनण्यास मोठे योगदान देईल. संरक्षण क्षेत्रासाठीचे अर्थसंकल्पीय वाटप अपेक्षित असताना, क्रिटिकल मिनरल्स मिशनची निर्मिती आणि लहान मॉड्युलर रिअक्टर्सविषयी भारताचे सुस्पष्ट धोरण दीर्घकाळात आत्मनिर्भर भारताला मोठे बळ देईल.

२०४७ पर्यंत विकसित भारताच्या व्हिजनने आपण सर्व प्रेरित झालो आहोत आणि मला विश्वास वाटतो की, हे उपक्रम एकत्रितपणे भारताच्या प्रगतीशील, एकत्रित आणि सर्वसमावेशक विकासाच्या दमदार ब्लूप्रिंटप्रमाणे काम करतील.

–          बाबा कल्याणी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज लि.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading