गुरुपौर्णिमा नव्हे, शिष्य पौर्णिमा – सरश्री
पुणे : गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून तेजगुरु सरश्री यांनी त्यांच्या अनुयायींसोबत गुरू पौर्णिमा नव्हे, शिष्य पौर्णिमा ही मोठ्या उत्साहात सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरश्री यांचे बोधप्रद मार्गदर्शन सर्व स्तरातील लोकांसाठी लाभदायक ठरले. प्रारंभी सरश्री यांच्या हस्ते ‘लिखान नियम’ या पुस्तकाचे अनावरण झालं. सरश्री यांनी आपल्या शिष्य समुदायाला प्रबोधन करण्याकरिता ‘शिष्यपौर्णिमा’ ही नवीन कल्पना सर्वांसमोर साकारली. यामध्ये त्यांनी आपण खानपान करताना कशा पद्धतीचे, भाव विचार व आचरण ठेवायला हवं, यावर दैनंदिन जीवनामध्ये होत असलेल्या चुकांवर अचूक बोट ठेवलं. लेखनाद्वारे आपल्याला सुज्ञ व सुजान नागरिक व समाज निर्माण होण्याकरिता आपलं घर स्वर्गासारखे कस बनवता येईल, यासाठी विविध तंत्र आणि मंत्र प्रस्तुत केले.
आपल्या जीवनामध्ये प्रेम, आनंद, मौन, साहस, कल्पकता आणण्याकरिता विविध उदाहरणांच्या, प्रतीकांच्या माध्यमातून सहजपणे समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी मार्गदर्शन केले. ऋग्वेदातील ऋचा आणि त्याचा अर्थ सोप्या पद्धतीने आपल्या शिष्यांना समजवण्यासाठी अचूक सल्ला दिला. आनंददायी आणि यशस्वी जीवनाकरिता चांगल्या सवयी आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्याला आनंदी होण्यासाठी तसेच सुखी जीवनाकरिता कोणत्याही कारणाची गरज नसून आनंदाचे गीत कोणत्याही परिस्थितीमध्ये गाता येते, हे सोदाहरण स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे ध्यान प्रार्थना ही जीवन समृद्ध करण्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे सरश्रींनी ‘मेरी गो राऊंड’ या उदाहरणावरून सुयोग्य प्रकारे समजावून दिले.
यावेळी दहा हजाराहून जास्त शिष्यांनी या दोन दिवसीय गुरु पौर्णिमा शिबिराचा लाभ घेतला. महाप्रसादाने या समारंभाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी सरश्री यांच्या विचारांसह कृपादर्शनाचा लाभ सर्व शिष्यांनी घेतला. तेजज्ञान फाउंडेशनच मूळ ध्येय समाजाला सुज्ञ व सुजाण समाज निर्माण करणे हे आहे. यावेळी ऑनलाईन माध्यमातून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोलांड अनेक देशातून शिष्यांनी यात सहभाग घेतला होता.
