Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा – आमदार हिरामण खोसकर

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच नाचक्की झाली. या निवडणुकीत काँग्रेसची तब्बल आठ मते फुटल्याची चर्चा रंगत आहे. यामध्ये माजी काँग्रेस नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असलेले आमदार आणि इतर काही आमदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव या यादीत घेतलं जाऊ लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून माझी बदनामी थांबवा असे आवाहन केले आहे.

विधानपरिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हिरामण खोसकर म्हणाले की माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याची बदनामी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्ष हायकमांडने थांबवली पाहिजे. माझ्यावर कारवाई करायची असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी मतदान चेक करा. मी फुटलो, असे जे सांगितले जात आहे ते पक्षाने आणि प्रसारमाध्यमांनी थांबवले पाहिजे असे आवाहन खोसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading