Wednesday, May 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना सुनावली ‘ही’ शिक्षा

मुंबई: मूळचे शिवसैनिक असूनही काही  काळ पक्षांपासून दूर गेल्याबद्दल वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने कामाला लागण्याची ‘शिक्षा ‘ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावली. मला पुण्यात शिवसेना आता आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढलेली बघायची आहे. ती जबाबदारी मी वसंत मोरे यांच्याकडे देतो, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

दीर्घाकाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक आणि कार्यक्षम नेते असलेल्या वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे सोडून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यातून निवडणूक लढवली. त्यात त्यांची अनामत रक्कमदेखील रद्द झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज त्यांनी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या बरोबर मनसेचे शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, दोन शहराध्यक्ष अशा तब्ब्ल 22 मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. 

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयार करण्याचे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली आहे. की लढाई लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी होती. आता विधानसभेची लढाई गद्दारी, धोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्ध असणार आहे. ती महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading