Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘ती’ परत येतेय… ‘रमाराघव’च्या सुखी संसारात मोठ्या वादळाची नांदी

 

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’वरील ‘रमा राघव’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. दिवसेंदिवस ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रमा-राघवची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. पण आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. रमा राघवच्या सुखी संसारात आता मोठ्या वादळाची नांदी होणार आहे.

‘रमा राघव’ मालिकेत नुकतीच पद्मिनीची एन्ट्री झाली आहे. रमाच्या चांगुलपणामुळे पद्मिनीला हळूहळू घरच्यांकडून स्वीकारलं जात आहे. तर दुसरीकडे वटपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फुगडी स्पर्धेपासून रमाला मात्र पद्मिनीच्या वागणुकीवर संशय येऊ लागला आहे. अशातच आता मालिकेत पुन्हा एकदा ‘तिची’ एन्ट्री होणार आहे. तिच्या एन्ट्रीने ‘रमा राघव’च्या सुखी संसारात मिठाचा खडा पडणार आहे.

रमाला राघवपासून दूर करण्याचा तिने अनेकदा प्रयत्न केला आहे. अशातच आता मालिकेच्या आगामी भागात पुरोहित कुटुंबावर पुन्हा एकदा ‘तिचं’ सावट आलेलं पाहायला मिळेल. पुरोहितांच्या वाड्यात पद्मिनीमुळे ‘तिची’ एन्ट्री होणार की पद्मिनी ‘तिची’ प्यादी आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकाच पाहावी लागेल. ‘रमा राघव’ ही मालिका प्रेक्षक सोम-शुक्र, रात्री 9.30 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही #Jiocimema वर पाहू शकता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading