गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर
भारतातील इथेनॉल आधारित रसायनांच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड (“द कंपनी” किंवा “जीबीएल”) ने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी“) कडे दाखल केला आहे.
३१ मार्च २०२४ पर्यंत, कंपनीकडे स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी समग्र बायो-रिफायनरी आहे आणि स्थापित क्षमतेच्या संदर्भात ती जगभरातील MPO (3 मिथाइल-3 पेंटेन-2-वन) ची सर्वात मोठी उत्पादक देखील होती. फ्रॉस्ट आणि सुलिव्हन अहवालानुसार नैसर्गिक 1,3 ब्युटीलीन ग्लायकोलच्या फक्त दोन उत्पादकांपैकी एक आणि बायो इथाइल अॅसीटेट तयार करणारी भारतातील एकमेव कंपनी आहे.
प्रत्येकी १० रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर कॅपिटलद्वारे निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. एकूण इश्यूमध्ये 3,250 दशलक्ष रु. [325 कोटी रु.] (“फ्रेश इश्यू”) पर्यंतचे इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 6,526,983 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफरचा समावेश आहे. (“ऑफर फॉर सेल”) [“एकूण ऑफर आकार”]
कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळालेले निव्वळ उत्पन्न निधीसाठी वापरण्याची योजना आखली आहे (i) कंपनीने घेतलेल्या 2,400 दशलक्ष रु. [२४० कोटी रु.] काही थकित कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/पूर्व पेमेंट आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशासाठी शिल्लक रक्कम (“फ्रेश इश्यू”)
ऑफर फॉर सेल मध्ये मंडला कॅपिटल एजी लिमिटेड [गुंतवणूकदार विक्री समभागधारक] द्वारे 4,926,983 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, सोमैया एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेडतर्फे500,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, समीर शांतीलाल सोमैया यांच्या तर्फे 2,00,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, लक्ष्मीवाडी माइन्स अँड मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्या तर्फे 2,00,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्सचा फिल्मीडिया कम्युनिकेशन सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे 300,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, सोमैया प्रॉपर्टीज अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (प्रोमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्सद्वारे) द्वारे 100,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स [“द सेलिंग शेअरहोल्डर्स”] यांचा समावेश आहे.
इक्वीरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. [“BRLMS”]
फ्रॉस्ट आणि सुलिव्हन अहवालानुसार कंपनीने 31 मार्च 2024 रोजी भारतातील पहिली जैव-आधारित EVE (इथिल व्हीनील ईथर्स) उत्पादन सुविधा स्थापन केली आहे आणि भारतातील EVE साठी आयातीला सक्षम पर्याय उभारण्याची संधी म्हणून काम करण्यासाठी सज्ज आहे.
EVE बाजारपेठेसाठी भारतीय बाजारपेठेचा आकार 2023 मध्ये अंदाजे 1,258 MT होता. भविष्याचा विचार करता 2028 पर्यंत ही बाजारपेठ 10.0% CAGR ने वाढून 2,026 MT पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. औषधनिर्माण आणि कृषी रसायन क्षेत्राकडून असलेल्या वाढत्या मागणीद्वारे मागणीतील वाढीला चालना मिळाली.
