Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

डायकिन तर्फे पुण्यातील कामकाजाचा विस्तार

 

पुणे : डायकिन इंडस्ट्रीज लि.जपान ची संपूर्ण उपकंपनी असलेल्या डायकिन एअरकंडिशनिंग इंडिया प्रा.लि.(डीएआयपीएल) या भारतातील एअरकंडिशनिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आपल्या अभिनवता आणि सेवा उत्कृष्टतेच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा गाठत विमाननगर (704 व 705ए,सातवा मजला ऑरविले बिझनेस पोर्ट,वेस्ट ॲव्हेन्यू रोड, कोणार्क  एपिटोम समोर,विमाननगर,पुणे) येथे आपल्या नव्या ऑफिसचे आज उद्घाटन केले.

हे नवीन कार्यालय महाराष्ट्राचे सामर्थ्य व येथील ग्राहकांच्या प्रती कंपनीची वचनबध्दता दर्शविते. या नवीन जागेत सर्व उत्पादन विक्री,सेवा,तांत्रिक साहाय्य आणि इतर सहाय्यक सेवा यासारखे विभाग असणार आहेत, जे चॅनेल भागीदार आणि ग्राहक या दोघांसाठी सेवा देतील. कंपनी महाराष्ट्राकडे सर्वोच्च संभाव्य बाजारपेठ म्हणून बघत असून एकूण एसी बाजारपेठेत वर्चस्व राखण्यासाठी कंपनी बाजारपेठ विकसित करण्यासाठी गुंतवणूक करणे  सुरू ठेवेल. आज डायकिनच्या उत्पादनांमध्ये डायकिन ग्लोबलची अतुलनीय गुणवत्ता टिकाऊपणा आणि किफायतशीर मालकी मिळते.

याप्रसंगी बोलताना डायकिन इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कंवल जीत जावा म्हणाले की, आम्ही ही शताब्दी साजरी करत असताना, 1924 मध्ये डायकिनच्या स्थापनेपासून ते एचव्हीएसी उद्योगात जागतिक नेतृत्व बनण्यापर्यंतच्या प्रवासाबाबत आम्हाला अभिमान आहे. हा टप्पा केवळ आमच्या तांत्रिक प्रगतीचा दाखला नसून ग्राहक भागीदार आणि समर्पित कर्मचाऱ्यांचा अतुट विश्वास आणि पाठिंब्याचे प्रतीक आहे.

भारतात डायकिनने गुणवत्ता आणि अभिनवतेचे प्रतीक म्हणून आपली ओळख घराघरात प्रस्थापित केली आहे.भारतातील आमचा प्रवास अत्याधुनिक उत्पादन सुविधांची स्थापना,प्रगत उत्पादने आणि शाश्वततेसाठी दृढ वचनबध्दतेसह महत्त्वपूर्ण कामगिरीने समृध्द झाला आहे.

उत्कृष्टतेची 100 वर्षे साजरी करत असताना आम्ही एचव्हीएसी उद्योगात अभिनवता आणि शाश्वततेप्रती असणारी आमची कटिबध्दता अधोरेखित करत आहोत.भविष्यातील आमचे उपक्रम उर्जा,कार्यक्षमता वाढविण्यावर,पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यावर आणि भारतातील ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

भारताची झपाट्याने प्रगती होत असताना महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचा आमचा दृष्टीकोन असून बाजारपेठेतील आणखी हिस्सा काबीज करण्यासाठी आमची नवीन उत्पादने महत्त्वाची ठरतील.

नवीन कार्यालयासह आमच्या मजबूत डीलर नेटवर्कच्या माध्यमातून उच्च प्रशिक्षित विक्री सेवा आणि देखभाल नेटवर्कद्वारे ग्राहकांना अतुलनीय अनुभव देण्यासाठी वचनबध्द आहोत.डायकिन इंडियाने गेल्या वर्षी 28 टक्के पेक्षा जास्त वाढ दर्शविली असून 2025 पर्यंत 16,000 कोटी रूपये महसूल मिळविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही अनेक नवीन उत्पादने आणणार असून आमचे डीलर नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारित करणार आहोत.पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रात होणाऱ्या मजबूत विकासामुळे स्मार्ट आणि उर्जा कार्यक्षम एअरकंडिनिंग सोल्युशन्सची मोठी मागणी दिसून येत आहे.आर्थिक वर्ष 2024-25 च्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील 30 टक्के हिस्सा काबीज करण्यासाठी विपणन उपक्रमात गुंतवणूक करण्याचा आम्ही विचार करत आहोत.

डायकिन इंडियाने आंध्रप्रदेश येथील श्री सिटी येथील आपली नवीन सुविधा कार्यान्वित केली असून 75.5 एकर जागेत विस्तारित आहे.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी येथे उत्पादनांची निर्मिती केली जाते.एअरकंडिशनर्सच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने लागू केलेल्या एसी श्रेणीतील प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) कार्यक्रमात डायकिन हे प्रमुख गुंतवणूकदार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading