Thursday, August 6, 2026
Latest NewsPUNE

‘सामान्य ते असामान्य’ या मुलाखतपर कार्यक्रमात उलगडणार प्रेरणादायी प्रवास

पुणे : पुण्यातील पी. एम. शहा फाऊंडेशन व वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुत्क विद्यमाने आयोजित ‘सामान्य ते असामान्य’ या प्रकट मुलाखत व संवादात्मक कार्यक्रमात अनाथ मुलांसाठी तळमळीने कार्य करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई शहा आणि त्यांची कन्या डिंपल घाडगे यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे.

येत्या शनिवार दि १५ जून रोजी सायं ४ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटल समोरच्या गल्लीत असलेल्या वर्धमान प्रतिष्ठानच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल, याची कृपया नोंद घ्यावी.

कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती देताना पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक अॅड चेतन गांधी म्हणाले, मंगलाताई शहा या दोन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्यातील पंढरपूर येथे पालवी प्रकल्पाअंतर्गत एच. आय. व्ही. बाधित तसेच अनाथ मुलांसाठी तळमळीने काम करीत आहेत. या कामात आता त्यांची मुलगी डिंपल घाडगे या देखील सहभागी झाल्या असून या आई मुलीच्या समाजसेवेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आम्ही यावेळी ‘सामान्य ते असामान्य’ या उपक्रमाअंतर्गत त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading