Tuesday, November 10, 2026
BusinessLatest News

महिंद्रा येत्या खरीप हंगामात महाराष्ट्रातील रोटाव्हेटर श्रेणीची वाढती मागणी पुरवण्यासाठी सज्ज

पुणे : महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टर ही आकडेवारीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आपल्या रोटाव्हेटर श्रेणीची वाढती मागणी पुरवण्यासाठी सज्ज होत आहे. येत्या खरीप हंगामात गहू आणि तांदळाचे भरघोस पीक घेतले जाण्याची अपेक्षा असून त्यासाठी ही श्रेणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गेल्या वर्षी हलक्या वजनाच्या विभागात महिंद्रा रोटाव्हेटर्सच्या यशस्वी पदार्पणानंतर कंपनी आता महाराष्ट्रात जलद शेती यांत्रिकीकरणासाठी हातभार लावणार आहे.

महिंद्राच्या भारतातील आर अँड डी सेंटरमध्ये तयार आणि विकसित करण्यात आलेल्या महिंद्रा सर्वसमावेशक रोटाव्हेटर्स श्रेणीमध्ये अवजडे ते हलक्या वजनाच्या विभागांसाठी उत्पादनांचा समावेश आहे व ते १५ ते ७० एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर्ससाठी योग्य आहेत. या श्रेणीमध्ये अवजड विभाग (महाव्हेटर सीकीज आणि महाव्हेटर एचडी (हेवी ड्युटी) सीरीज आणि मध्यम विभाग (सुपरव्हेटर सीरीज) आणि हलक्या वजनाचा विभाग (गायरोव्हेटर सीरीज आणि पॅडीव्हेटर सीरीज) आणि लहान ट्रॅक्टर मालक व फळबागा शेतकऱ्यांसाठी मिनीव्हेटर सीरीज यांचा समावेश आहे.

स्थैर्य आणि टिकाऊपणाच्या बाबतीत महिंद्राचे रोटाव्हेटर्स त्रासमुक्त आणि चांगल्या कामगिरीची खात्री करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शेतांत चाचणी घेण्यात आले आहेत. महिंद्राचे टिकाऊ बोरोब्लेड्स पाणथळ, कोरडवाहू जमीन, द्राक्षांचे मळे आणि फळबागांमधली माती चांगल्या प्रकारे उकरण्याची खात्री देतात. यामुळे रोपे लावण्यासाठी चांगल्या दर्जाचे बियाणे तयार करणे आणि निरोगी रोपांच्या वाढीसाठी तण व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते. वेगवेगळ्या गियरच्या कॉम्बिनेशनमुळे वेगाने फिरवता येतो आणि इंधन कार्यक्षमताही वाढते. या रेंजसाठी उत्कृष्ट दर्जाचा पेंट वापरण्यात आला आहे, जो तीव्र हवामानातही चांगल्या प्रकारे टिकून राहातो.

महाराष्ट्रात महिंद्राच्या रोटाव्हेटर्सची विक्री महिंद्रा ट्रॅक्टर वितरकांचे नेटवर्क तसेच एक्सक्लुसिव्ह वितरकांद्वारे केली जाणार आहे. महिंद्रा फायनान्सद्वारे व्हेरिएंट्सनुसार १०० टक्के आकर्षक कर्ज योजनाही पुरवली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या मनःशांतीसाठी महिंद्राच्या रोटाव्हेटर्सवर १ ते २ वर्षांची सर्वोत्तम उत्पादक वॉरंटीही देण्यात येणार आहे, जी बाकीच्या उत्पादकांतर्फे दिल्या जाणाऱ्या सहा महिन्यांच्या वॉरंटीपेक्षा बरीच जास्त आहे.

Leave a Reply