Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिन साजरा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ व सुमनकिर्ती कार्स प्रा. लि, एकाक्ष फाउंडेशन आणि यंग इन्स्पेक्टर नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठ आवारामध्ये वृक्षारोपण व वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विद्यापीठाच्या आवारात आंबा, आवळा, चिंच, फणस, लिंबू, सिताफळ इत्यादी फळरोपांची लागवड करण्यात आली.

या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य  रविंद्र शिंगणापूरकर, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले,  राजेश पुनावळे,  मिलींद सोनवणे, अनिकेत बनसोडे,  अनिकेत मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी कार्बन मॅपींग व कार्बन ऑडीट याची सशक्त पर्यावरणातील गरज व वृक्षांचे महत्त्व या विषयावर उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांचे मार्गदर्शन केले. या वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading