Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Lok Sabha Election Result : नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांचा दणदणीत विजय, हिना गावितांचा पराभव 

नंदुरबार: महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा झटका बसला आहे. कारण भाजपच्या दोन वेळा खासदार हीना गावित यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने नंदुरबारमधून विजयाचा गुलाल उधळला आहे.

आदिवासीबहुल नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित व ॲड. के. सी. पाडवी या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला सर करुन सलग दोनदा विजयी झालेल्या भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्यापुढे यंदा काँग्रेसचे नवखे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. नंदुरबार हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने याच मतदारसंघातून प्रचाराचे रणशिंग फुंकलेले आहे. इंदिरा गांधींना ‘माय’ म्हणणारा हा मतदारसंघ दहा वर्षांपूर्वी मात्र भाजपच्या ताब्यात गेला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading