Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संपूर्ण निकाल जाहीर होण्या पुर्वीच, मोदीं कडून ‘निवडणुक आयोगाची पाठराखण व देशाची दिशाभूल’ – गोपाळदादा तिवारी

पुणे : १८ व्या लोकसभेचा निकाल दिवसभर फेरी प्रमाणे, टप्प्या टप्प्याने जाहीर होत असतांना, ५४३ जागांपैकी मात्र ३५२ जागांचे निकाल (रात्री ९ वा) अघिकृत जाहीर झाले असतांना व उर्वरीत निकाल जाहीर होणे अद्याप बाकी असतांना व तेथील मतमोजणी प्रक्रिया जारी असतांना…(काळजीवाहू) वर्तमान पंतप्रधान मोदींनी मात्र इंडीया आधाडीच्या जागा, भाजप’ला मिळालेल्या २३४ जागा एवढ्या देखील नाहीत (?)” हे भाजप कार्यालयातील भाषणात, कशाच्या आधारे सांगितले..?
असा संतप्त सवाल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला असून, वर्तमान पंतप्रधान मोदी हे अजुनही देशाची दिशाभुल करत असल्याचा आरोप ही केला.
तसेच निवडणुक आयोगास “पारदर्शक व चांगल्या पध्दतीने निवडणुका हाताळल्या बद्दल प्रशस्ती पत्रक देण्याची निवडणुक आयोगाची पाठराखण करण्याची घाई देखील मोदी का करत आहेत”.. (?) असा सवाल केला.
जनतेने मोदींच्या ४०० पार च्या आवाहनास प्रतिसाद न देऊनही, देशाच्या पंतप्रधानाकडुन सत्ता लोलुपतेच्या नियमबाह्य स्वार्थी वृत्तीचे प्रदर्शन होत असल्याने तीव्र खेद व निषेध व्यक्त करत असल्याचे काँग्रेस राज प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading