पूनावाला फिनकॉर्पने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा
31 मे 2024 रोजी जीएनपीए 1 टक्क्यांच्या तर एनएनपीए 0.5 टक्क्यांच्या खाली आणण्यात यश
पुणे : ग्राहक आणि एमएसएमई फायनान्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या तसेच नॉन-डिपॉझिट पध्दतीने कार्यरत असलेल्या पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड या आघाडीच्या एनबीएफसीने 31 मे 2024 रोजी आपला ढोबळ एनपीए (जीएनपीए) एक टक्क्यांच्या खाली आणला आहे. तसेच निव्वळ एनपीएसुध्दा (एनएनपीए) 0.5 टक्क्यांच्या खाली आणत कंपनीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. कंपनीने दमदार अशी आर्थिक कामगिरी नोंदवत असताना मालमत्ता व्यस्थापनामध्ये (एयूएम) मजबूत वाढ, नफा आणि उत्कृष्ट मालमत्ता गुणवत्ता या सर्व पातळीवर चमकार कामगिरीचे प्रदर्शन केलेले आहे.
कंपनी कामगिरीवर व्यवस्थापनाची टिप्पणी
“कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभय भुतडा यांच्या गतिशील नेतृत्वाखाली कंपनीने कर्ज वितरणाच्या क्षेत्रात आपला मार्ग यशस्वीरीत्या बदलताना एनबीएफसी क्षेत्रात गेल्या ३ वर्षांतील सर्वात मोठे परिवर्तन करुन दाखविताना कंपनीने आपला एकूण एयूएम निधी 25,000 कोटी रुपयांपुढे नेला आहे. तसेच करोत्तर नफ्यात (पॅट) 2023-24 या आर्थिक वर्षात 1,000 कोटी रुपयांचा टप्पासुध्दा पार केला आहे. 2021 मध्ये संपादन करताना व्यवस्थापनाने आखलेल्या व्हिजन 2025 योजनेनुसार, 2025 पर्यंत निव्वळ एनपीएचे प्रमाण एक टक्क्यांच्या खाली आणण्याचे उद्दिष्ट आखलेले होते. परंतु कंपनीने 31 मे 2024 पर्यंत ढोबळ एनपीए एक टक्क्यांच्या खाली तर निव्वळ एनपीए 0.5 टक्क्यांच्या खाली आणत आपले उद्दीष्ट गाठले आहे. धोरणात्मक व्यवसाय मॉडेल, जोखीम आणि प्रशासनासाठी स्वीकारलेली सक्षम अशी पद्धत तसेच संकलनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा यामुळे मूळ मालमत्तेच्या गुणवत्ता राखत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करणे कंपनीला शक्य झाले आहे.”
एनबीएफसी क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी परिवर्तनावर एक दृष्टीक्षेप
|
घटक (स्वतंत्र)
|
डिसेंबर-20 (लेगसी मॅग्मा)
(संपादनपुर्व )
|
मार्च-24 (पूनावाला फिनकॉर्प)
(संपादनपश्चात)
|
|
व्यवस्थापनातंर्गत असलेली मालमत्ता (एयूएम)
|
11,631 कोटी रु.
|
₹ 25,003 कोटी रु
|
|
कर्ज घेण्याची किंमत (%)
|
9.64%
|
8.17%
|
|
जीएस थ्री/ढोबळ एनपीए (%)
|
8.23%
|
1.16% *
|
|
एनएस थ्री/निव्वळ एनपीए (%)
|
5.35%
|
0.59% *
|
|
मालत्तेवरील परतावा (%)
|
0.04%
|
5.73%
|
|
प्रति कर्मचारी एयूएम
|
2.14 कोटी रु
|
11 कोटी रु
|
|
प्रति कर्मचारी पीबीटी
|
0.12 लाख रु
|
68 लाख रु
|
|
संकलन
|
रोख
|
डिजीटल
|
|
शाखा
|
255
|
102
|
|
कर्ज वितरण पध्दत
|
भौतिक रितीने
|
डिजीटल
|
|
न्यू टू क्रेडीट
|
हो
|
नाही
|
|
डेटा आधारित कर्जवितरण
|
नाही
|
हो
|
|
क्रेडीट रेटींग
|
AA- (CARE)
|
AAA (CRISIL & CARE)
|
|
थेट आणि डिजीटल व्यवसाय (%)
|
~10%
|
81%
|
|
डिजीटल फर्स्ट दृष्टीकोन
|
नाही
|
हो
|
* व्यवसाय वाढ, विवेकपूर्ण पत धोरणे आणि सुधारित संकलन कार्यक्षमतेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे 31 मे 2024 पर्यंत जीएनपीए आणि एनएनपीएचे आकडे अनुक्रमे 1% आणि 0.5% पेक्षा कमी झाले आहेत.
विविध आर्थिक पातळीवर दीर्घकालीन अंदाज (सर्व निकषांमध्ये मिळविलेले यश)
कंपनीच्या दीर्घकालीन अंदाजाच्या तुलनेत मुख्य आर्थिक चौकटीत कंपनीची कामगिरी खालीलप्रमाणे झालेली आहे:
|
क्र.
|
घटक
|
श्रेणी
|
प्रत्यक्ष (मार्च 24)
|
|
1.
|
एयूएममधील वाढ
|
35-40%
|
55%
|
|
2.
|
नफ्यातील वाढ
|
30-35%
|
84%
|
|
3.
|
जीएनपीए
|
1.3-1.8%
|
1.16% *
|
|
4.
|
एऩएनपीए
|
0.5-0.9%
|
0.59% *
|
|
5.
|
मालमत्तेवरील परतावा
|
4-4.5%
|
5.73%
|
* व्यवसाय वाढ, विवेकपूर्ण पत धोरणे आणि सुधारित संकलन कार्यक्षमतेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, 31 मे 2024 पर्यंत जीएनपीए आणि एनएनपीएचे आकडे अनुक्रमे 1 % आणि 0.5% पेक्षा कमी झाले आहेत.
