fbpx
Sunday, May 12, 2024
Latest NewsPUNE

बारामतीचा दुप्पट वेगाने विकास करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवा- महादेव जानकर

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला आहे.  देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात महायुतीचे राज्यातील नेते प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी ते उभे असलेल्या परभणी मतदारसंघाचे मतदान पार पडताच थेट बारामतीत लक्ष घातले आहे.  ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विकासात भर घालण्यासाठी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा दुप्पट वेगाने विकास करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवा,’ असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे. 

महायुतीचा घटक पक्ष असलेला रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर परभणी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. तेथील मतदान संपणताच लगेच दुसऱ्या दिवशी जानकर शनिवारी बारामती मतदारसंघात दाखल झाले आहेत. यावेळी अॅड. सचिन राऊत, अॅड. श्रीकांत करे, विजय पाटील, महेश जठार, अभिजित शहाणे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जानकर म्हणाले, ‘बारामतीसारखाच संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खंबीरपणे साथ द्या, देशातील महत्त्वपूर्ण लढत म्हणून बारामतीकडे पाहिले जात आहे. मतदान करताना आपल्या मतदारसंघाची प्रगती करण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाला संधी द्या,’ असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, महादेव जानकर हे येत्या दोन  दिवसांत बारामती, इंदापूर, दौंड, भोर या ठिकाणी सभा घेणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading