fbpx
Sunday, May 12, 2024
Latest NewsPUNE

कुंकू लावायचं असेल तर एकाचेच लावा;अजितदादांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे.  शरद पवार आणि अजित पवार यांचे होम पिच बारामती आहे यामुळे  इथे अनेक कार्यकर्त्यांची अडचण झाल्याचे दिसते, परिणामी काही लोक ताई आणि दादा असे दोघांच्याही संपर्कात आहे किंवा दोघांच्याही सभांना हजेरी लावतात, अशा कार्यकर्त्यांना सज्जड दम देत “कुंकू लावायचं असेल तर एकाचेच लावा, माझं तरी लावा नाही तर त्यांचे तरी लावा” असे अजित पवार यांनी सुनावले.

बारामती लोकसभा मंतदारससंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सासवड येथे आयोजि सभेत अजित पवार बोलत होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सरकार चालवताना आम्हाला सगळेच बघावे लागते, फक्त बारामती बघून चालत नाही.  इंदापूर, दौंड, पुरंदरअसे सगळेच बघावे लागते. पण अडकलेल्या कामातून मार्ग काढायचा असेल तर मी सांगतो पुन्हा ते दुसरं कोणीही करू शकत नाही केंद्रात येणारच सरकार करू शकेल. आत्ता आमचं जे युतीचं सरकार आहे, त्याच मदतीने हे होवू शकेल. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तो मतदार राजा आहेत ट्याने आपले पवित्र मतं आम्हाला द्यावे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी ज्या माणसांना प्रतिष्ठा दिला त्या कार्यकर्त्यांच्या पैकी जर कोणी चुकला तर परत अजित पवारची पायरी चढायची नाही. अनेकांना जिंकून आणण्यासाठी मी जीवाच रान केलं. कोणाला दूध संघाचा डायरेक्टर केलं तर बऱ्याच जणांना संस्थांच्या संचालक पदी  निवडून आणल. मात्र, आता त्यांनी माझ्याशी कस वागायचं  हे ठरवायचं आहे. मागे बँकेच्या निवडणुकीत गंमत झाली. पण ती सहकाराची निवडणूक होती त्यात तुमच्या आमच्या पाण्याचा प्रश्न नव्हता. पण या निवडणुकीत असं करून चालणार नाही. यामुले घड्याळं चिन्हाळा मत देऊन विकासाला साथ द्या. 

सूनच घराची खरी लक्ष्मी

मी एकदा खासदार आणि सातवेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. सुरवातीला मलाही रास्ते माहीत नव्हते, भाषण करताना भीती वाटायची पण मी सगळ शिकलो. कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही. स्वतःला सिद्ध कारीतच शिकायच असत. यापूर्वी तुम्ही पवार साहेबांना, मुलाला, लेकीला संधी दिली आता सुनेला संधी देण्याची वेळ आली आहे. कारण शेवटी सूनच घराची खरी लक्ष्मी असते. काही काळानंतर सासू सुद्धा सुनेच्याच हातात घराच्या चाव्या देते. असा टोला शरद पवारांना आजितदादांनी लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading