Monday, October 12, 2026
Latest NewsMAHARASHTRA

विरोधक गैरसमज पसरवत आहेत, हा डाव मुस्लिम बांधवांनी हाणून पाडवा – उदय सामंत

 

रायगड : मुस्लिम बांधव आम्हाला परके नाहीत. विरोधक त्यांच्यामध्ये जाऊन सध्या जो काही चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम करत आहे तो डाव मुस्लिम बांधवांनी हाणून पाडला पाहिजे. वक्फ बोर्डाचे कार्यालय रत्नागिरीमध्ये सुरू करण्याची मागणी येथील मुस्लिम बांधवांनी केलेली आहे. याबद्दल मला सांगायला आनंद वाटतो की आचारसंहिता लागण्यापूर्वी पंधरा दिवसच या संदर्भाचा निर्णय झाला असून लवकरच या जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू होईल याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज केली.

रायगड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी मंडणगड, जि. रत्नागिरी येथे आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सुनील तटकरे, शिवसेना नेते रामदास कदम, आमदार भरत गोंगावले आदी मान्यवर उपस्थित होते.

अनंत गीते यांच्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले, ज्या कुणबी बांधवांना भावनिक साध घालून मत मागण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या बांधवांसाठी नऊ वेळा खासदार असून देखील साधे कुणबी भवन सुद्धा ते बांधू शकले नाही, आज महायुती सरकारच्या माध्यमातून हे कुणबी भवन राजापूर पासून मंडणगड पर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. ते आज तागायत गीतेंना का जमलं नाही? असा सवाल देखील  सामंत यांनी विचारला.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, जे सात टर्म मंत्री होते केंद्रामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे गावाच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. परंतु आगामी काळात आंबवडे गावाच्या विकासासाठी महायुती सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू व एक वर्षात जागतिक दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करू असा विश्वास देखील उद्या सामंत यांनी दिला. तसेच याची प्रक्रिया देखील सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली आहे, असे देखील सांगितले.

शेवटी बोलताना ते म्हणाले, आपण जरी वेगवेगळे असलो तरी महायुतीचा धर्म म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मतदारांना जसे आम्ही सांगतो की आपले खरे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत.  तसं आम्हीही तेच मानतो की उमेदवार कोणीही असो आपल्याला मत मोदींनाच द्यायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुनील तरकारे देखील मोठ्या मताधिकयाने जिंकतील असा मला विश्वास वाटतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading