fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

लळीत पायघडीचे कीर्तन व श्रीरामराज्याभिषेक सोहळा तुळशीबाग श्रीराम मंदिरात साजरा

पुणे : प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्यातील मूर्तीपासून पाऊले उमटलेली शुभवस्त्रे तुळशीबाग श्रीराम मंदिराच्या सभामंडपात आली आणि त्यावर फुलांची उधळण करीत श्रीरामराज्याभिषेक सोहळा थाटात पार पडला. लळीत पायघडीचे कीर्तन सुरु असताना राज्याभिषेक सोहळा अनुभविण्यासोबतच ‘रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन…’ ही पदे देखील तुळशीबागवाले कुटुंबियांकडून म्हणण्यात आली. संपूर्ण भारतात पायघड्यांचा हा सोहळा पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात साजरा होतो, हे विशेष.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात लळीत पायघडीचे कीर्तन व श्रीराम राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे.

रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम… श्रीराम जय राम जय जय राम चा अखंड गजर करण्यात आला. कुटुंबातील सदस्य व संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले यांच्या हस्ते श्रीराम राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उत्सवकाळातील मानक-यांचा सन्मान देखील करण्यात आला. कीर्तनकार ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे कीर्तन झाले.

राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले म्हणाले, श्रीरामजन्माननंतर पायघड्यांचा हा सोहळा फक्त तुळशीबागेतील राम मंदिरात साजरा केला जातो. नविन पांढ-या शुभ्र वस्त्रावर श्रीरामांच्या पावलांचे ठसे उमटविले जातात आणि हे वस्त्र गाभा-यापासून सभामंडपापर्यंत आणले जाते. यावेळी लळीत पायघड्या चे कीर्तन करण्यात येते. त्यानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. सोहळ््यानंतर उत्सवकाळातील मानक-यांचा पुष्पहार व श्रीफळ देवून सन्मान करण्यात येतो, असे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading