fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRA

अजान सुरू झाली अन् सुनील तटकरे यांनी भाषण थांबवल

रायगड : देशभरात लोकसभा निवडणुकीला सुरूवात झाली असून प्रचार सभा जागोजागी होताना दिसत आहे. राजकीत वातावरणा बरोबरच राज्यातील तापमान देखील ऊन्हामुळे तापले आहे. अशा उन्हातदेखील महायुतीचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत. आज दुपारी भर उन्हात मंडणगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची सभा सुरू होती. अनेक नेत्यांची भाषणं झाली. अन् सुनील तटकरे बोलायला उभे राहिले. भाषण सुरू झालं अन् दुपारच्या अजानच भोंगा वाजला. यावेळी तटकरे यांनी आपलं भाषण थांबवल.

मंडणगड येथे रायगड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

विकासासाठी सत्तेत सहभाग महत्वाचा आहे, या यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सत्तेत सहभागी झालो, असे सांगून सुनील तटकरे म्हणाले, आज गीते म्हणतात की आम्ही विश्वासघात केला पण मी विश्वासघात केला नाही मी फक्त नेतृत्व बदल केला आहे. पण तुम्ही तर जनतेचा विश्वासघात केलेला आहे अशी टीका  सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर केली

पुढे बोलताना ते म्हणाले, आज मातोश्रीवर मुस्लिम बांधवांना बोलवून त्यांना भाई म्हणून संबोधले जात आहे. कारण  पुढच्या राजकारणामध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तफावत घेत त्यांना वाटचाल करायची आहे.
नरेंद्र मोदी  यांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी भारताची राज्यघटना बदली जाणार आहे, असा गैरसमज पासरवला जात आहे.  परंतु आपला भारत देश हा राज्यघटनेने बांधलेला आहे. त्या राज्यघटनेच्या चौकटीत राहून देशाला कसं पुढे नेता येईल याचा विचार नरेंद्र मोदी करत आहेत. एनडीएचे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राज्यातील आणि तालुके आणि जिल्हे अल्पसंख्यांक  म्हणून जाहीर केले.  यूपीएच्या काळामध्ये ही योजना नव्हती आणि या माध्यमातून मंडणगड हा देखील अल्पसंख्यांक बहुल तालुका जाहीर करण्यात आला मात्र आनंद गीते यांनी एकही रुपयांचा निधी यासाठी आणला नाही.

अनंत गीते या त्यावेळी हरलेल्या नगरसेवकाला मी बाळासाहेबांशी बोलून कशी खासदारकीची उमेदवारी मिळवून दिली, हा किस्सा यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगीतला. तसेच जो माणूस शिवसेना प्रमुखांचा नाही झाला, कोकण वासीयांचा नाही झाला तो तुमचा कसा होवू शकतो, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading