Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

Loksabha election : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांचे अर्ज दाखल

पुणे : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीतील रायगड आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्राताई पवार यांनी तर रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांनी आज अर्ज दाखल केले.

बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीयमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते. यावेळी पुण्यात महायुतीची मोठी सभा देखील पार पडली. या सभेतून महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

तर रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार सुनिल तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदींसह महायुतीचे आमदार उपस्थित होते. यावेळी सुनील तटकरे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

अजित पवारांनीही दाखल केला डमी अर्ज राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून डमी अर्ज दाखल केला असल्याचे सांगतानाच रायगडमधून पुन्हा एकदा सुनिल तटकरे यांना पक्षाने उमेदवारी दिली असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading